बचतगटांच्या वस्तूंसाठी ऑनलाईन ट्रेडींग सुरू करणार

पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन, गोदाई महोत्सवाचे उदघाटन

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी

आज प्रत्येक जिल्हयात बचतगट कार्यरत आहेत त्यांच्याकडून विविध वस्तू उत्पादित केल्या जातात परंतु त्यांच्या मालाला योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध होत नाही.

या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नागपुर विभागात बचतगट मॉल उभारण्यात येणार आहे. याशि
वाय या वस्तू शहरात तसेच देशाच्या कानाकोपरयात पोहचविता याव्यात त्यासाठी ई पोर्टल तयार करून ऑनलाईन ट्रेडींग करण्याची शासनाची योजना आहे, असे प्रतिपादन महिला बालकल्याण व ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

डोंगरे वसतीगृहावर शासनाच्या ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता बचत समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री असलेल्या गोदाई 2017 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्रीbachat-gat चुंबळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण, पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभर असे प्रदर्शन शासन आयोजित करणार आहे.

याशिवाय सॅनिटरी नॅपकीनबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी अस्मिता नावाची योजना लवकरच शासन आणणार आहे. त्याव्दारे महिलांच्या आरोग्यासाठी काम करता येईल शिवाय सॅनिटरी नॅपकीन हे बाजारभावापेक्षा तीस ते चाळीस टक्के दराने उपलब्ध करून देता येतील.

शिवाय ते वितरीत करण्याचे काम बचतगटांना मिळवून देत त्याचा नफा बचतगटांना देता येईल. याबाबत वित्त मंत्रयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून ते लवकरच याला मंजुरी देतील.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींनाही कमी दरात हे नॅपकीन उपलब्ध करून दिले जातील. पहिल्या वर्षी सिंहस्थ, दुसरया वर्षी तांत्रिक अडचण यामुळे हा महोत्सव होवू शकला नाही परंतु आताचे आयोजन हे भव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*