बंधार्‍याला लोखंडी गेट न दिल्यामुळे पाणी अडविण्यासाठी धडपड

0

पुणतांबा (वार्ताहर)- परिसरातील डेरा नाला भागात जल युक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेल्या सिमेंट बंधार्‍यासाठी वारंवार मागणी करूनही ठेकेदाराने लोखंडी गेट न दिल्यामुळे या बंधार्‍यात पाणी अडविण्यासाठी लगतच्या लाभार्थी शेतकर्‍यांना खूपच धडपड करावी लागत आहे.

 

 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजने अंतर्गत डॉ. धनवटे व लगतच्या शेतकर्‍यांनी लोकवर्गणीतून स्वतःच्या जमिनी देऊन चराचे रुंदीकरण व खोलीकरण केले होते. शासनाने तातडीने अंदाजे बारा लाख खर्चाचा सिमेंट बंधाराही बांधला आहे.

 

 

बंधार्‍यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यासाठी लोखंडी गेटची व्यवस्था आहे. वर्ष झाले तरी ठेकेदाराने लोखंडी गेट दिले नाही. ना. विखे पाटील यांच्या हस्ते या बंधार्‍याचा जलपूजनाचा कार्यक्रम होता, तशी कल्पना लघु सिंचन विभागाच्या श्रीरामपूर कार्यालयाला दिली होती.

 

 

मात्र अधिकारी व ठेकेदाराने दखल घेतली नाही. त्यामूळे ऐनवेळी शेतकर्‍यांनी प्लॅस्टीक गोण्यात माती भरून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे फारसे यश आले नाही. बंधार्‍याला तातडीने गेट बसविले नाही तर लघु सिंचन विभागाच्या श्रीरामपूर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकरी शुकलेश्वर पेटकर, संजय जाधव, भिमा शिंगाडे, डॉ. बखळे आदींसह शेतकर्‍यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*