बंगळुरूला येत्या 27 ते 31 दरम्यान सैन्यदल भरती ; विविध पदांसाठी पात्र उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन

0

नाशिक : लष्कराची छावणी असलेल्या बंगळुरू येथे टेरॉटोरियल (ढ.अ.) ‘थलसेना’ आर्मी 116 इंफ्रन्ट्री बटालियनमध्ये 42 सोल्जर (सैनिक), 1 क्लर्क, 1 सफाईवाला, 2 स्वयंपाकी अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 27 ते 30मार्च दरम्यान, राबवण्यात येणार असून बंगळुरू येथील जेसी नगरच्या पॅराशूट रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरच्या मैदानावर 7 राज्यांसह 3 केंद्रशासित प्रदेशातील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतील अशी माहिती देवळाली येथील कमांडिंग ऑफिसर मेजर सिनम पुरहाचंद्र यांनी पत्रकान्वये दिली आहे.

सदर भरतीप्रक्रियेत महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गोवा त्याचप्रमाणे दादरा नगर हवेली, द्विव दमण व लक्षद्वीप आणि पाँडेचरी येथील उमेदवारांना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये जनरल सोल्जर्स, क्लर्क, सफाईवाला व स्वयंपाकी या पदासाठी अनुक्रमे 10 वी, 12वी व 8 वी पास असणे आवश्यक असून त्यामध्ये 45 % गुण असणे अनिवार्य आहे.

इच्छुक उमेदवारांची उंची 160 सें.मी. वजन 50 किलो, छाती न फुगवता 77 सेमी.तर फुगवून 82 सें.मी. अशी क्षमता तर उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये 1 कि.मी धावणे, लांब उडी, पूल अप्स या आदी प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी, शहीद मुलगा व मुलगा नसल्यास जावई तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू यांना शारीरिक क्षमतेत काही अंशी सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांना सैन्यदलासाठीच्या शारीरिक क्षमता असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक, क्रीडा, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र यांसह शैक्षणिक पात्रतेचे सर्व मूळ प्रमाणपत्र भरतीसाठी येतांना सोबत आणावे. पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन लष्कराच्या सूत्रांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*