बँक फसवणूकप्रकरणी संशयितांचा घेणार ताबा

0

नाशिक | दि.११ प्रतिनिधी – शासनाच्या युनायटेड पेमेंट इन्टरफेस (यूपीआय) ऍपचा वापर करून फसवणूक केल्याचे प्रकार शहरातही उघडकीस येत असून औरंगाबाद पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना नाशिक पोलीसही ताब्यात घेणार आहेत. यासाठी शहर पोलीस औरंगाबाद पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुरक्षित आर्थिक व्यवहार होण्यासाठी केंद्र शासनाने भीम व युनायटेड पेमेंट इन्टरफेस (यूपीआय) ऍप सुरू केले आहेत. परंतु या ऍपद्वारे प्रामुख्याने महाराष्ट्र बँकेच्या खात्यांवरील अनेकांची कोट्यवधींची रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचे प्रकार औरंगाबाद येथे उघडकीस आले आहेत.

यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या अटकेचे वृत्त शहर पोलिसांना कळल्यानंतर नाशिक येथील अश्याच प्रकारे घडलेल्या घटनांचा तपास पुन्हा सुरू झाला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात तसेच नाशिक तालुका,मनमाड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही असे प्रकार नोंदवण्यात आले होते.

या प्रकरणांचा यूपीआयशी संबंध पडताळून पाहिला जात आहे. त्यासाठी शहर पोलिसांचे एक पथक कामाला लागले आहे. मात्र संशयित संध्या औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात असल्याने शहर पोलीस कोठडी संपण्याची वाट पाहत आहेत. औरंगाबाद पोलिसांचा तपास पूर्ण होताच या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलीस प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फसवणूक असल्यास पुढे यावे
यूपीआय ऍप्स अंतर्गत फसवणूक झाल्याची एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. परंतु जर नाशिक येथील इतरही अनेक नागरिकांची फसवणूक असेल तर अशांनी लवकरात लवकर पुढे येऊन संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. औरंगाबाद पोलिसांची कोठडी पूर्ण होताच आम्ही संशयितांचा ताबा घेण्यासाठी प्रयत्नात आहोत.
– डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त

LEAVE A REPLY

*