बँकेची तिजोरी फोडणारा संशयित गजाआड

0

जळगाव /बुलढाणा जिल्ह्यातील धरणगाव शाखेतील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकमधील तिजोरी फोडणार्‍या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरिविठ्ठलनगरमधून ताब्यात घेतले.

बुलढाणा जिल्ह्यातील धरणगाव शाखेत दि.2 फेब्रुवारी 2016 रोजी एकाने बँकेचे चॅनल गेट तोडून जबरी जोरी केली होती.

याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यामध्ये 51/16 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी हा जळगाव शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पथकाने हरिविठ्ठल नगरातून सागरसिंग जीवनसिंग बिन्नी याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्याला पुढील कारवाईसाठी मलकापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*