फ्रेंच गयानामधून ‘जीसॅट-१७’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0

अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७ चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

‘एरियन- ५’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हे अंतराळात झेपावले.

जीसॅट १७ या उपग्रहाचे बुधवारी दुपारी प्रक्षेपण होणार होते. मात्र खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी गुरुवारी हवामान प्रक्षेपणासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाल्यावर जीसॅट-१७ उपग्रह अंतराळात झेपावले.

जीसॅट १७ हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आहे.

या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे

LEAVE A REPLY

*