फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, तर दुसरी सेमीफायनल आज

0

सेंट पीटर्सबर्ग (रशिया): मंगळवारी फ्रान्स आणि बेल्जीयम संघामध्ये अंतिम सामन्याच्या तिकिटासाठी झालेल्या लढतीत ​​फ्रांसने बेल्जीयमला 1-0 ने पराभूत करून फिफा विश्वचषक 2018 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सने 2006 नंतर प्रथमच फाइनलमध्ये जागा काबीज केली आहे. तर या पराभवानंतर प्रथमच अंतिम सामन्यात खेळण्याचं बेल्जियमच स्वप्न भंगले आहे.

या सामन्यात 51 व्या मिनिटाला सैमुएल उममतीने एक गोल केला. त्यानंतर बेल्जियमच्या अथक प्रयत्नांनंतरएकही गोल झाला नाही. फ्रान्सचाय या विजयात त्यांचा गोलकीपर हुगो लोरीसचा मोठा हात होता, त्याने ऐनवेळी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आणि फ्रान्सला विजय मिळवून दिला. इंग्लंड आणि क्रोएशिया दरम्यान बुधवारी उपांत्य पूर्व फेरीचा दुसरा सामना होणार आहे. या कडे सर्वच लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*