फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणा-या 100 खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडू विराट कोहली

0
फोर्ब्सने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या 100 खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीत विराट कोहली 89 व्या क्रमांकावर आहे.
या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश असून यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर आहे.
विराट कोहलीची एकूण कमाई दोन कोटी 20 लाख डॉलर इतकी आहे.
यामधील 30 लाख डॉलर त्याने मानधन आणि पुरस्कारांच्या माध्यमातून कमावले आहेत. तर एकूण एक कोटी 90 लाख डॉलर्सची कमाई जाहिरातींच्या माध्यमातून केली आहे.

LEAVE A REPLY

*