फोटो एडिटिंग करून मागितली पाच लाखांची खंडणी ; दोघांना अटक

0

उपनगर : अश्लील फोटोंवर एडिटिंग करून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. यापैकी एकाला नाशिकमधून तर दुसऱ्याला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.

cyber
अटक करण्यात आलेला आरोपी

याबाबत फिर्यादीने गुन्हा ११ फेब्रुवारीला दाखल केला होता. यामध्ये अश्लील फोटोंवर फिर्यादीचा चेहरा लाऊन अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवण्यात आले होते. तसेच जर पाच लाख रुपये खंडणी दिली नाही तर हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली होती.

फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसी सूत्रे फिरवण्यात आली होती. अखेर आज उपनगर पोलिसांना दोघांना अटक करण्यात यश आले. या कामगिरीत गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभागाचे मोठे योगदान मिळाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जयंत प्रभाकर झांबरे (वय ४२, रा. flat १०२, पहिला माळा, जय प्राईड अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक) व राकेश गोरख पवार (वय ३० वर्षे, रा. हिराजी सदन, रूम नंबर ३०१ सेक्टर -२० ऐरोली, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नवे आहेत.

LEAVE A REPLY

*