फेसबूकचे एअरटेलसोबत टायअप; ‘वाय-फाय एक्स्प्रेस’ सुरु

0
सोशल मीडिया नेटवर्क कंपनी फेसबूकने आपल्या ‘वाय-फाय एक्सप्रेस ’ सेवेचा गुरुवारी भारतात शुभारंभ केला.
या सेवेअंतर्गत फेसबूक ग्रामीण भागातील लोकांना सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबूकने आपली वादग्रस्त ‘फ्री बेसिक्स’ सेवा बंद केल्याच्या जवळपास एक वर्षानंतर ही नवी सेवा सुरु केली आहे.
‘फ्री बेसिक्स’ मध्ये काही निवडक वेबसाईट्सवर मोफत पोहोचण्याची सुविधा होती. मात्र वाय-फाय एक्सप्रेस पेड मॉडल असणार आहे.
फेसबूकने आपल्या या नव्या योजनेसाठी दूरसंचार कंपनी एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे. कंपनी पुढील काही महिन्यात 20 हजाराहून अधिक वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करणार आहे.

LEAVE A REPLY

*