Type to search

आवर्जून वाचाच सेल्फी

फेसबुक पोस्ट करा थ्रीडी फोटो

Share

छोट्यांनो, तुम्ही फेसबुक वापरत असाल तर अनेक जण थ्रीडी फोटो पोस्ट करत असल्याचे लक्षात आले असेल. अशा फोटोंना थ्रीडी इफेक्ट मिळालेला असतो. ते पाहिल्यावर तुम्हीही असे फोटो पोस्ट करण्यासाठी शोधाशोध सुरू केली असेल.

गुगलला विचारले असेल. तर मुलांनो, फेसबुकनेच हे फिचर आणले आहे. थ्रीडी फोटो ऑन फेसबुकचा वापर करून फोटोला थ्रीडी लूक देता येतो. फोटो स्क्रॉल, टिल्ट किंवा पॅन करून थ्रीडीमध्ये बघता येतो. हा थ्रीडी फोटो कसा पोस्ट करायचा हे आपण समजून घेऊ या. आयफोन 7 प्लस, 8 प्लस, आयफोन एक्स, एक्सएस, एक्सएस मॅक्स किंवा एक्सआरमधून थ्रीडी फोटो पोस्ट करता येईल.

कॅमेर्‍यातला पोर्टेट मोड सुरू करून फोटो क्लिक करा. आता फेसबुक अ‍ॅपवर जा. न्यू पोस्ट ऑप्शनवर क्लिक करा. थ्रीडी फोटोजचा पर्याय निवडून आयफोनच्या फोटो गॅलरीत जा. पोस्ट करायच्या इमेजवर क्लिक करा आणि शेअर करा. तुम्ही शेअर केलेला फोटो इतरांना थ्रीडी रूपात दिसेल.

थ्रीडी रूपात पोस्ट करायचे फोटो नीट काढायला हवे. थ्रीडी इफेक्ट उठून दिसण्यासाठी ऑब्जेक्ट आणि कॅमेर्‍यात किमान 3 फुटांचे अंतर हवे. कॉन्ट्रास्टिंग कलर्सचा वापर करावा. यामुळे फोटोला जास्त खोली मिळते आणि थ्रीडी इफेक्ट जास्त छान वाटतो. मग काय दोस्तांनो, तंत्रज्ञानात काही बदल झाले की तुम्ही लगेच प्रयोग करून बघता. आपल्याला फोटोजना वेगवेगळे इफेक्टस्ही द्यायचे असतात. मग या थ्रीडी फिचरचा उपयोग करून बघा. तुमचे नक्कीच कौतुक होईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!