फेसबुक करणार अन्नाची ‘होम डिलेवरी’

0
फेसबुकचे सीईओ मार्क झूकरबर्ग कोणत्याही परिस्थितीत आपल्या फेसबुक यूजर्सला फेसबुकवरून दूर जाऊ देणार नाही. त्यासाठी फेसबुक मध्ये  रोज नव-नवीन फीचर लॉन्च करत आहे.

फेसबुकच्या माध्यमाने नोकरी शोधण्याचे ऑप्शन दिल्यानंतर आता त्यांनी फूड डिलीवरीसाठी ऑर्डर फूड फीचर लॉन्च केले आहे. फूड डिलीवरीसाठी फेसबुकने Delivery.com आणि स्लाइसशी अमेरिकेत पार्टनरशिप केली आहे.

फूड ऑर्डर फीचरच्या मदतीने फेसबुक यूजर्स पार्टनरशिप असणार्‍या रेस्टोरेंटमधून फूड ऑर्डर करू शकतील. हे फीचर फेसबुकच्या मोबाइल एप आणि डेस्कटॉप दोघांसाठी आहे.

फूड ऑर्डर करण्याचे ऑप्शन नेविगेशन मेनू (सर्च बार) मध्ये मिळेल. ज्यात एड टू कार्ट, एडिट ऑर्डर आणि पेमेंटचे ऑप्शन असेल. पेमेंट केल्यानंतर तुमच्या फेसबुक स्क्रीनवर ऑर्डरचे कन्फर्मेशन मिळेल.

तसेच डिलीवरीची वेळ देखील तुम्हाला मिळेल. त्याशिवाय यूजर्सची इ-मेल आयडीवर देखील ऑर्डरचे मेल कनफर्मेशन मिळेल.

अद्याप हे अजून स्पष्ट नाही आहे की फेसबुक या फीचरला अमेरिकेनंतर भारतात हे फिचर कधी लाँच होते हे महत्त्वाचे ठरेल.

LEAVE A REPLY

*