फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांना

0

फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर येते आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकच्या २२ विभागांमधील तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली आहे.

फेसबुकच्या एक हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली आहे. हे सर्व कर्मचारी दहशतवाद्यांचा प्रचार-प्रसार आणि अश्लिल पोस्ट रोखण्याचे काम करतात.

सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या बगमुळे या कर्मचाऱ्यांचीच माहिती लीक झाली आहे. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी संशयित दहशतवाद्यांना फेसबुकवर बॅन केले, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती बॅन करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पोहोचली आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून एका कर्मचाऱ्याने राजीनामा देत घरचा रस्ता धरला आहे.

LEAVE A REPLY

*