फुले मार्केटच्या जागेबाबत तपशिलवार खुलासा सादर करण्यासाठी आयुक्तांनी मागितली जिल्हाधिकार्‍यांकडे महिनाभराची मुदत

0

जळगाव |  प्रतिनिधी :  महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा महसूलची असून ही जागा ताब्यात का घेवू नये? यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी महापालिकेला नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागितला. परंतु तपशिलवार खुलासा सादर करण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महिनाभराची मुदत मागितली आहे.

महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलाची जागा ही सत्ता ब प्रकाराची आहे. ही जागा दैनंदिन बाजार व आठवडे बाजार या प्रयोजनासाठी देण्यात आली होती. परंतु तत्कालीन जळगाव नपाने जमिन वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तातरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची किंवा शासनाची पुर्व परवानगी घेतलेली नसून अटी-शर्तीचे भंग केले.

त्यामुळे ही जागा सरकार जमा का करण्यात येवू नये, यासाठी शासनाच्या आदेशान्वये जिल्हाधिकार्‍यांनी महानगरपालिकेला नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला. दरम्यान, याप्रकरणी शर्तभंग झाले नसल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला.

तसेच जागेबाबतचा विषय १०० वर्षापूर्वीचा असल्याने तपशिलवार खुलासा देणे अपेक्षित आहे. परंतु सात दिवसात कागदपत्रांसह खुलासा सादर करणे, शक्य नाही. त्यामुळे तपशिलवार खुलासा सादर करण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली आहे.

LEAVE A REPLY

*