डॉ. चंदन चौधरी

होमिओपॅथी ही मुख्यः मानसिकतेवरच अवलंबून आहे. मानसिकता आणि होमिओपॅथीचा खूप जवळचा संबंध आहे. होमिओपॅथीकद़ृष्ट्या आपण कसे बोलतो, कसे राहतो, ताण तणावाचे प्रसंग, दुःख-आनंद, निरनिराळ्या प्रकारची भीती या सगळ्या गोष्टीतून आपली मानसिकता घडते आणि त्यातूनच विविध प्रकारचे आजार निर्माण होतात.

आताच्या विकसनशील जगात मानवाला अशक्य असे काहीही नाही. जसे की, आपण आपले सांधे बदलू शकतो, रक्ताची गरज वाटली तर ब्लड बँकमधून रक्त घेऊ शकतो.

आपण आपले बरेच अवयव बदलू शकतो. पण आपण आपला मेंदू प्रत्यारोपण करु शकत नाही. मेंदू म्हणजे आपला मुख्य अवयव म्हणून तिथूनच आपल्या सगळ्या गोष्टी चालत असतात. पण जर का त्याच्यासोबत छेडछाड झाली म्हणजे खूप ताण-तणाव, अचानक धक्का बसणं सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूवर प्रभाव करुन आपली मानसिकता ढासळते आणि आपल्याला आजार निर्माण होतात. आपण जर आधी बघितल तर आपले आजी-आजोबा त्यांचे आई-वडील म्हणजे आपल्या पणजीपर्यंत जरी विचार केला तरी आता जे मोठे आजार निर्माण झालेत, तसे आजार नव्हते.

कारण तेव्हा त्या धोक्याच्या जास्त अपेक्षा नसायच्या. आता धकाधकीच्या जीवनात अपेक्षा वाढल्या. त्यातून ताण-तणाव वाढले आणि त्याचा सरळ प्रभाव आपल्या मानसिकतेवर झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण झाले. आता तुम्ही म्हणाल आजार हे प्रत्येकाला होतात का? तर नाही.

प्रत्येकाची विचारशक्ती ही वेगळी असते. प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. एखाद संकट आल्यावर प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने प्रतिक्रिया दाखवेल. कोणी तो धक्का समजेल. कोणी ते मान्य करेल. त्यातून जर आपण स्वतःला मानसिकरीत्या मजबूत ठेवल तर आपण निरोगी राहतो.

होमिओपॅथीमध्ये आपण पूर्ण माणसांचा स्वभाव कसा आहे, त्याच्या आयुष्यात मागे काही गोष्टी घडून गेलेल्या/ असतात त्या गोष्टींचा त्याच्यावर काय परिणाम झाला तसेच त्याच्या मनातील भीती इ. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन औषध देतो आणि रुग्ण बरा होतो. हे सांगायचा उद्देश असा की, आपण मानसिकरीत्या जेवढे चांगले राहू, तेवढेच आपण निरोगी राहू. त्यासाठी स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचे आहे. आपण धकाधकीच्या जीवनात स्वतःला वेळ देत नाहीत. दुसरी गोष्ट व्यक्त होणे, आपल्या मनात काय आहे, व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे. आता कोविडमध्येसुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोविड झाला असे समजल्यानेच काही लोक मरतात. कोविड रुग्ण होमिओपॅथीनेसुद्धा बरे होत आहेत. त्यामुळे आपण कुठल्या परिस्थितीत कस वागतो, त्यावर आपली मानसिकता अवलंबून असते आणि आपलं आरोग्यसुद्धा होमिओपॅथीबद्दल गैरसमज.

आपण वर सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथीमध्ये आजारांपेक्षा जास्त मानसिकतेला महत्त्व दिले जाते. त्यावर योग्य ती औषध देऊन रुग्ण बरे होतात पण आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतो आणि आम्ही त्याला काही प्रश्न विचारतो, तेव्हा रुग्णाला वाटत की आम्ही विचारतोय ते तर आमच्या आजाराशी संबंधित नाही. त्यामुळे हा गैरसमज दूर झाला तरी आपण पूर्ण माहिती असते ती नक्कीच रुग्णांना बरे करण्यात फायदेशीर असते.

काही विचार सकारात्मक काही नकारात्मक. गोंधळ निर्माण करणारे काही स्वार्थी, काही निष्कलंक असे दिवसभरात 70 हजारांच्यावर विचारतरंग या मानवी मनात तयार होत असतात. यात विचारांच्या चक्रांचा व त्याच्या गतीचा प्रभाव अनुभवी होमिओपॅथी बारकाईने अवलोकन करीत असतो.

उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या शाब्दित, शारीरिक हावभावाचे त्यांना अवलोकन करावे लागते. व्यक्तीची चंचलता, स्थैर्य, गांभीर्य, एकलकोंडेपणा, हसरा चेहरा, रडणे, बोलण्याची पद्धत, मनातील अनामिक भीती याबाबींचे अवलोकन करुन सखोल चिकित्सा करायला उपयुक्त ठरतात.

होमिओपॅथीमध्ये एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारावर दिलेले औषध हे दुसर्यासारख्या आजार असलेल्या व्यक्तीला तेच औषध दिले जाईल असे नाही. कारण औषध आजारावर नाही तर व्यक्तीच्या स्वभावावर दिले जाते. असे म्हणतात की, माणसाचा स्वभाव बदलता येत नाही किंवा स्वभावावर औषध नाही. परंतु, होमिओपॅथीमध्ये स्वभावावर औषध देऊन रुग्ण बरा होतो.

होमिओपॅथीमध्ये केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंतच्या सगळ्या आजारांवर उपचार होतात. पण सर्व बरे करण्याची म्हणजेच उपचार करण्यासाठी रुग्णाची मानसिकता लक्षात घेऊनच उपचार केले जातात.

आपण बघतो लहान मुलांमध्ये जन्मतःकाही विकलांगता येणे किंवा काही इतर व्याधी असणे याचा आईच्या गर्भावस्थेशी खूप जवळचा संबंध आहे. गर्भावस्थेमध्ये आईची मानसिक अवस्था चांगली असणे खूप महत्त्वाची असते. लहान मुलांमध्ये काही गंभीर आजार असतील जस की फीट येणं किंवा जन्मतः काही व्याधी असणं.

मानसिक आजार इतर या सगळ्यांवर उपचार करण्यासाठी गरोदरपणातील आईची अवस्था लक्षात घेऊन औषध दिले जाते.

उदाहरण द्यावयाचे म्हटले तर आपल्याला अभिमन्यूचा चक्रव्युहचा प्रसंग माहितीच आहे. गर्भारपणात आईची मनोधारणा कशी होती. तिला त्यावेळी होणार्या जाणिवा किती संवेदनशील होत्या. कोणकोणते विचार तिच्या मनात सातत्याने यायचे? कशाची भीती करायची? स्वप्न कशी पडायची? गर्भारपणात मातेच्या शारीरीक बदलाशिवाय काही मानसिक बदल होत होते का? गर्भावस्थेत असताना तिची जीवनशैली, खाणे, पिणे आणि विशेषतः काही शारीरिक अथवा मानसिक आघात तिच्यावर झाले का? त्याबाबत काही पूर्वइतिहास आहे का? ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांवर उपचार करतांना खूप महत्त्वाच्या असतात आणि यावरच औषध असते. त्यामुळे गर्भारपणात आईची मानसिक स्थिती चांगली असणे खूप महत्त्वाचे असते.

सद्यःस्थितीचा जर आपण विचार केला तर कोविडसारख्या आजाराने जगभरात थैमान मांडले आहे. कोरोना आपल्याला फक्त शरीरावर परिणाम करताना दिसत आहे पण त्याचे परिणाम मानसिकरीत्यासुद्धा होत आहेत. आपण पाहतो आहोत की, याकाळात मानसिकरीत्या खूप खच्चीकरण होत आहे. अनेक लोकांचे रोजगार गेले. उद्योगधंदे बंद पडले आर्थिक नियोजन कोलमडून बर्याच प्रमाणात आर्थिक चणचण भासू लागली. याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होऊन डिप्रेशन, चिडचिड होऊन मानसिक आजार वाढू लागले. या काळात आपण बर्याच लोकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही ऐकल्या. या सगळ्या तणावातून मानसिकरीत्या जो व्यक्ती स्थिर राहतो. तोच व्यक्ती या सगळ्यांना तोंड देऊन पुढे जाऊ शकतो. मानसिकरीत्या स्थिर राहण्यासाठी घरच्यासोबत वेळ घालवणे, घरच्यांसोबत सुसंवाद साधणे.

एकमेकांना धीर देणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या भावना मनात न ठेवता त्या जर योग्य ठिकाणी व्यक्त केल्या गेल्या तर नक्कीच आपण मानसिक आजाराच्या कचाट्यात सापडणार नाही. आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा आपण निरोगी राहू.

मानसिक तणावामुळे काही लक्षणं जाणवतात. त्यात डोके सातत्याने दुखणे, छातीची धडघड वाढणे, थकवा जाणवणे, थरथरणे, झोप न येणे, लघवी किंवा शौचास जावेसे वाटणे, धाप लागणे, शरीराच्या अनावश्यक हालचाली वाढणे, छातीवर वजन आल्यासारखे वाढणे, अशा लक्षणांचा उगम ताणतणावामुळे होतो. अपुळशीूं, रिळपळल वळीेीवशी या आजारांशी आपण परिचित आहोतच. यातून बरे होण्यास होमिओपॅथी आपल्याला नक्कीच मदत करते; कारण होमिओपॅथी मूळतः मानसिकतेवरच अवलंबून आहे. त्यामुळे आपण म्हणतो. ‘सीर सलामत; तो पगडी पचास’ तेच खरे.....

कन्सल्टिंग होमिओपॅथी

राम होमिओपॅथिक क्लिनिक