Type to search

आरोग्यदूत

फिट्स येणे

Share

एपिलेप्सी म्हणजे काय? फिट्स येणे म्हणजे काय?
फीट्स या मज्जांसंस्थेच्या (नर्व्हस सिस्टिममुळे) होणारा आजार आहे. हा आजार कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो.
हा आजार होण्याची काही कारणे अशी असतात.
१) एखाद्या अपघातात डोक्याला वा मेंदूला इजा होणे
२) मेंदूत रक्तस्त्राव होणे.

पण जास्त करून हा आजार होण्याची कारणे ही समजून येत नाहीत. वारंवार फिट्स आल्यानंतरच याचे निदान होऊ शकते.
आपल्या मेंदूमध्ये काही विद्युत लहरी तयार होतात व त्यामुळे आपल्याला फीट्स/ऍटॅक येतात. आपला मेंदू हा आपल्या संपूर्ण शरीराला कंट्रोल करत असतो. या अटॅकच्या वेळी मेंदूचा शरीरावरील कंट्रोल काही प्रमाणात किंवा संपूर्णत: सुटतो. त्यामुळे मेंदूच्या ज्या भागावर परिणाम होतो, तो भाग आपल्या शरीराच्या ज्या अवयवाला कंट्रोल करतो, त्या अवयवावरचा कंट्रोल सुटतो.

सामान्यत: फिट्सचे दोन प्रकार आहेत.
१) जनरल फीट्स-ज्यात पूर्ण मेंदूवर परिणाम होतो.
२) पार्शियल फिट्स- ज्यात मेंदूच्या काही भागावरच परिणाम होतो.
आता आपण या दोन्हींची डिटेलमध्ये माहिती बघू या.
१) जनरल फिट्स – संपूर्ण मेंदूवर परिणाम

या प्रकारच्या फिट्सचे मुख्यत: ४ प्रकार असतात.
अ) रोनिक-क्लोनिक फिट्स –
यामध्ये अचानक शुद्ध हरपू शकते. तसेच संपूर्ण शरीर सुरुवातीला अचानक ताठ/कडक होणे (टोनिक फेज) आणि नंतर हात व पायांना झटके येणे (क्लोनिक फेज) ही लक्षणे असतात. आजारी व्यक्तीची जीभ चावली जाते किंवा लघवीही होऊ शकते.
एकदा फीट येऊन गेल्यानंतर त्याची शुद्ध परत येते.
ब) ऍब्सेन्स फीट्स –
या प्रकारच्या फिट्स ह्या अगदी थोड्या वेळाकरता (काही सेकंदासाठी) येतात. पण दिवसातून त्या बर्‍याच वेळा येतात. जेव्हा अशा फिट्स येतात तेव्हा ह्या व्यक्ती काही क्षण एकदम स्तब्ध होतात. ते लगेच व्यवस्थित होतात. बर्‍याच वेळा ही गोष्ट इतरांच्या लक्षात सुद्धा येत नाही. लहान मुलांना यामुळे अभ्यासात अथवा इतर गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. त्यामुळे त्यांना अभ्यासात अडचणी येतात.
क) मायक्लोनिक फिट्स –
यामध्ये त्यांच्या शरीराला झटके बसतात. (हात व पायांना) त्यामुळे त्यांच्या हातातील वस्तू पडू शकतात.
ड) ऍटोनिक फिट्स –
यामध्ये अचानक आपल्या स्नायूंची ताकद प्रचंड कमी होते व शुद्ध हरपू शकते. अशा व्यक्ती लगेचच व्यवस्थित होतात. पण अशा प्रकारे पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला किंवा शरीराच्या इतर भागांना इजा होऊ शकते.
फिट्स या आजाराचे हे ४ प्रकार आहेत. आपण या आजारात काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यामुळे होणार्‍या परिणामांची गंभीरता कमी करू शकतो.

२) पार्शियल फिट्स (अंशत: येणार्‍या फिट्स) – या प्रकाराच्या फिट्समुळे आजारी व्यक्तीची शुद्ध पूर्णपणे जात नाही. त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीची संपूर्णपणे जाणीव असते. फक्त शरीरातील काही भागावरचा त्यांचा कंट्रोल जातो.
उदा.
१) शरीरातील एखाद्या अवयवाला झटके येणे/ जोरजोरात हलणे.
२) एखाद्या ठिकाणी मुंग्या येणे/ टोचल्यासारख्या वेदना होणे.
३) डोळ्यांसमोर नसलेल्या गोष्टी, वस्तू अथवा प्राणी दिसणे.
४) आवाज संगीत ऐकू येणे (नसलेले)
५) वेगवेगळ्या प्रकरचे वास येणे.
६) चक्कर येणे.
७) विचित्र विचार येणे, अचानक भीती वाटणे. अस्वस्थ वाटणे.
८) श्‍वासोच्छ्वास अनियमित होणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, ताप येणे, थंडी वाजणे.

यामध्ये काही वेळाने असे पेशन्टस् व्यवस्थित होतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळीच फॉलोअप, चेकअपला गेले पाहिजे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या परिस्थितीची, औषधांच्या परिणामांची माहिती कळते. त्यानंतरच ते व्यवस्थितपणे योग्य ती औषधे देऊ शकतात.

हे योग्य औषध तुम्हाला सूट व्हायला कदाचित वेळ लागू शकतो. पण जर तुम्हाला फिट्सच्या आजारापासून कायमची सुटका हवी असेल तर मात्र नियमितपणे फॉलोअप-चेकअप केलाच पाहिजे.

सुरुवातीला न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर औषधांचा डोस कमी प्रमाणात सुरू करतात. जसजसे तुमचे शरीर औषधांचा स्वीकार करून त्यावर प्रतिक्रिया द्यायला लागते. तसतसा हा औषधांचा डोस डॉक्टर वाढवतात. दिवसातून २ ते ३ वेळा तुम्हाला औषधे दिली जातात.तुमची औषधे रोज सारख्याच वेळी घ्या. चुकून कधी विसरलात तर मग लवकरात लवकर तुमचा डोस घ्या.
आनंद दिवाण

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!