फाईल गहाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची हालचाल

0
जळगाव । दि.13। प्रतिनिधी-ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्चर गृप अ‍ॅण्ड विजयकुमार जैन व्हेंचर यांनी बदलविल्याची तक्रार अ‍ॅड. विजय पाटील यांनी केली होती.
त्यानुसार प्रशासनातर्फे चौकशी करण्यात येत असून मूळ लेआऊटची फाईल नगररचना विभागातून गहाळ झाली आहे. त्यामूळे संबधीत अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरु झाली आहे.
तसेच नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदविणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहे.
ममुराबाद रस्त्यावरील गट नं.507 मधील जागेतून 50 फुट रुंदीचा नैसर्गिक लेंडी नाला गेल्या 100 वर्षापासून वाहत आहे.
परंतू श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्चर गृप अ‍ॅण्ड विजयकूमार जैन व्हेंचर यांनी इमारत बांधकामासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करुन प्रवाह बदलविला आहे.

त्यामुळे बांधकामाला स्थगिती द्यावी अशी तक्रार अ‍ॅड. विजय पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी नगररचना विभागातील अधिकार्‍यांना पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

तसेच आयुक्तांनी स्वतः नाल्याची पाहणी केली होती. आयुक्तांनी केलेल्या पाहणीच्या अनुषंगाने श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्चर गृप अ‍ॅण्ड विजयकूमार जैन व्हेंचर यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती.

त्यानुसार संबधीतांनी मनपा प्रशासनाकडे काही कागदपत्रांची मागणी केलीय. त्यानुषंगाने आयुक्तांनी फाईल मागविली असता नगररचना विभागातून फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

त्यानुसार संबंधीत अधिकार्‍यांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची हालचाल प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. तसेच 100 वर्षापासून वाहत असलेला नैसर्गिक प्रवाह बदलविण्याविरुध्द देखील कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*