‘फन्ने खान’ चित्रपटात ऐश्वर्याची वर्णी!

0

राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा नवा चित्रपट ‘फन्ने खान’मध्ये ऐश्वर्याची वर्णी लागू शकते. या चित्रपटासाठी ऐश्वर्याला साईन करण्यात येणार असल्याची तूर्तास चर्चा आहे. गतवर्षी या चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर अनिल कपूरने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर शेअर केला होता.
या चित्रपटासाठी अनिल कपूरला आधीच साईन करण्यात आले आहे. मेहरा या चित्रपटाचे प्रोड्यूसर असतील. तर अतुल मांजरेकर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. या चित्रपटाद्वारे अतुल मांजरेकर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. या चित्रपटात अनिल कपूर एका सिंगरच्या पित्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ऐश्वर्याची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘फन्ने खान’ हा चित्रपट एक कॉमेडी सिंगींग कथेवर आधारित चित्रपट असेल. खरे तर हा चित्रपट आत्तापर्यंत तयार व्हायला हवा होता. पण ‘मिर्झिया’ या चित्रपटामुळे त्याचे काम काहीसे रखडले. ‘मिर्झिया’द्वारे अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने बॉलिवूड डेब्यू केले होते.

LEAVE A REPLY

*