फडणवीस सरकारला विजेसाठी यावल भाजपाचा घरचा आहेर

0

यावल / येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गाने शेतीसाठी विज मंडळ उपअभियंता यावल यांना विजपुरवठा सुरळीत 8 तास द्यावा, या मागणीसाठी निवेदन सादर केले.

24 तासातून 8 तास विजपुरवठा मिळत होता. 4/5 दिवसापासून शेती पंपाना फक्त 3/4 तास विजपुरवठा मिळत असून बागायती पिके धोक्यात आली आहे.

लोडशेडिंग व ब्रेकडाऊनचे नाव सांगून शेतकर्‍यांना मंडळ वेठीस धरत असून लवकर 8 तास पुरवठा शेतीसाठी सुरळीत न झाल्यास भाजपातर्फे तीव्र आंदोलन झेडले जाईल, असे निवेदनात नमुद आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष हेमराज फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, उमेश फेगडे, राजेंद्र महाजन, प्रमोद नेमाडे, गोपालसिंह पाटील, किशोर कुळकर्णी, पराग बोरोले सह 20 ते 25 शेतकरीही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*