प्रेग्नेंट सोहा अली खान अडचणीत! हरियाणा कोर्टात एफआयआर दाखल

0

सैफ अली खानची बहीण सोहा अली खान हिच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे.

पण आता प्रेग्नेंट सोहा अली खान अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हरियाणाच्या लोकायुक्तांनी सोहा अली खानविरूद्ध आर्म्स लायसेन्स प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

सोहा अली खानला १९९६ मध्ये शस्त्रास्त्र परवाना जारी करण्यात आला होता. पण तेव्हा तिचे वय १८ वर्षे एक महिना होते.

कायद्यानुसार, शस्त्रास्त्र परवाना बाळगण्याचे कायदेशीर वय २१ वर्षे आहे. त्यामुळे सोहा अडचणीत सापडली आहे. सोहाने अवैधरित्या शस्त्रास्त्र परवाना बनवल्याची तक्रार लोकायुक्तांकडे २०१६ मध्ये आली होती.

पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे अध्यक्ष नरेश कादियान यांनी ही तक्रार दाखल केली होती.

LEAVE A REPLY

*