प्रियांका चोप्रा निर्मिती करणार विनोदी मालिका!

0

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा आता एका विनोदी मालिकेची निर्मिती करते आहे.

ही मालिका माधुरी दीक्षित हिच्या आयुष्याशी निगडित आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार ही मालिका माधुरीच्या जीवनावर आधारित असेल.

लग्नानंतर माधुरी अमेरिकेत शिफ्ट झाली तिथे गेल्यावर तिचा अनुभव, तिथल्या कुटुंबांबरोबर तिने घालवलेला वेळ आणि माधुरीने तिथे केलेले बदल हे सर्व यात पाहायला मिळणार आहे अर्थात ही मालिका विनोदी असणार आहे.

डॉ. नेनेशी लग्न झाल्यावर माधुरीने चित्रपटातून ब्रेक घेतला आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी ती भारतात परतली. 2 सुंदर मुलांची आई असलेल्या माधुरीने 5 वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीत पुन्हा पदार्पण केले आहे आणि आजही तिचा जादू कायम आहे.

माधुरीला या मालिकेबद्दल विचारले असता ती म्हणाली ” अमेरिकेत राहुन मला फार छान वाटले. तो एक चांगला अनुभव होता. मला तिथे फार मजा आली तुम्हाला लवकरच कळेल मला नेमकं काय म्हणायचे आहे ते.” श्री राव ही मालिका लिहणार असून त्यांना माधुरीचे पती डॉ नेनेसुद्धा साथ देणार आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मार्क गॉर्डन कंपनी तर्फे निक पेपर आणि मार्क गॉर्डन हे निर्माते असून एबीसी स्टुडिओ सहनिर्मिती करणार आहेत.

LEAVE A REPLY

*