प्रियांका चोप्राच्या ‘इझंट इट रोमॅण्टिक’ हॉलिवूडपटाचे शुटिंग सुरू

0

प्रियांका चोप्राने आपल्या आगामी हॉलिवूड सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे.

या सिनेमातला तिचा नवीन अंदाज नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सिनेमात ती एका ‘योग मेसेंजर’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.

मंगळवारी ती ‘इझंट इट रोमॅण्टिक’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती.

सिनेमाचे दृश्य न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये चित्रीत करण्यात आले होते. या दृश्यात तिच्यासोबत अभिनेता अॅडम डिवाईनही दिसत आहे. या सिनेमात प्रियांकासोबत लिआम हेम्सवर्थ ब्लॅकही आहे.

२०१९ मध्ये १४ फेब्रुवारीला म्हणजेच ‘व्हेलेंटाइन डे’ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*