प्रियांकाची निर्मिती असलेल्या 6 सिनेमांची घोषणा

0
अभिनेत्री प्रियांका चोप्राची पर्पल पेब्बल ही निर्मिती संस्था तब्बल सहा सिनेमे घेऊन कानमध्ये दाखल झाली होती.
या सहा सिनेमांची कानमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सध्या या सिनेमांवर काम सुरू आहे.
पर्पल पेबलची निर्मिती असलेले सहा सिनेमे घेऊन प्रियांचा चोप्राची आई म्हणजेच मधु चोप्रा कानमध्ये हजर होत्या. सिक्किम राज्यावर आधारीत ‘पाहुना’ या सिनेमाचा पहिला लूक कानमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पाखी ए टायकवाला यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
प्रियांकाची निर्मिती संस्था विविध भाषांवर सिनेमे बनवते आहे.
पर्पल पेब्बलचा पहिला सिनेमा व्हेंटिलेटर बॉक्सऑफिसवर चांगलाच गाजला होता. तसंच या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. ‘व्हेंटिलेटरच्या यशानंतर सिनेमाच्या मोठ्या दुनियेत आम्ही प्रवेश करतो आहे.
या नव्या प्रवासासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. पाहुना हा सिनेमा सिक्किमवर प्रकाश टाकणार आहे.
नेपाळमध्ये माओवाद्यांच्या हिंसेपासून वाचण्यासाठी तीन मुलं तेथून पळ काढतात आणि आपल्या आई-वडिलांपासून दूर होतात, याचं चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे’, असं मधु चोप्रा यांनी सांगितलं आहे.
सिक्किममध्ये शुटिंग करणं चॅलेन्ज असल्याचं मधु चोप्रा म्हणतात. या सिनेमाचा प्रीमियर सिक्किममध्येही केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*