प्रा. प्रदीप दीक्षित यांनी समाजकार्यात योगदान द्यावे

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी- सेवानिवृत्तीनंतर प्रदीप दीक्षित यांनी सामाजिक कार्यात लक्ष देण्याची गरज आहे. ती त्यांनी समर्थपणे सांभाळावी, अशी अपेक्षा उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी केले.
शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे एमएचएसएच हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप दिक्षीत यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच झाला. त्यावेळी श्री. रावल बोलत होते.

यावेळी सरकारसाहेब म्हणाले की, प्रा.प्रदीप दीक्षित यांनी शिक्षकाची भूमिका बजावतांना स्पष्ट स्वरूपात पत्रकारिता केली. त्यांच्या वृत्तपत्रीय मी लिखाणाला महत्व देत असतो.

त्यांनी शिंदखेडा शहरासह तालुक्याच्या समस्या शासनाच्या नजरेस आणून दिल्याचा इतिहास आहे, असेही सरकारसाहेब म्हणाले.

शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, प्रकाश चौधरी व अरुण देसले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारिता व त्याचा उपयोग प्रा. दिक्षीत यांनी विधायक कामासाठी केला. यापुढेही करावा, असा सूर या मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रदीप दीक्षित आणि पत्नी सौ.चारुशीला दीक्षित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी यावेळी दूरध्वनीवरून दिक्षीत यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

LEAVE A REPLY

*