Type to search

धुळे

प्रामाणिक कार्यकर्ता हीच माझी खरी ताकद

Share

दोंडाईचा । मी वयाच्या 28 व्या वर्षी सन 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडुन आलो, तेव्हापासून जे कार्यकर्ते जोपासले त्यात सन 2009, सन 2014 मध्ये मोठी वाढ होत गेली, म्हणूनच मला माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मेहनतीच्या बळावर सलग तीनवेळा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधी मिळाली सलग दोन वेळा शिंदखेडा मधून मला 50 हजाराचा मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांची मेहनत असते. कुणाकडे पैशांची ताकद असेल पण माझ्याकडे प्रामाणिक कार्यकर्त्यांची ताकद असून ही आमची भूमिपुत्रांची टीम एवढी मजबुत आहे, कितीही बाहेरचे येवून आमच्यावर राज्य करण्याच्या वल्गना करतील परंतू त्यांना पुन्हा एकदा आपल्याच मुंबईचे तिकीट काढून आम्ही सुरू केलेल्या खान्देश एक्सप्रेसने मुंबईला रवाना करण्याची वेळ येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा महायुतीचे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी ना.जयकुमार रावल यांनी केले.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ना.जयकुमार रावल यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी हितगुज केले. यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, जेष्ठ नेते राजेंद्र देसले, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, तालुकाध्यक्ष नथा पाटील, जि.प.सदस्य कामराज निकम, शिंदखेडा शहराचे गटनेते अनिल वानखेडे, जेष्ठ नेते साहेबराव खरकार, शहराध्यक्ष प्रविण महाजन, माळमाथा परीसराचे नेते दगा शेलार, मानसिंग गिरासे, आप्पा बागले, रवि उपाध्ये, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, मंगेश पवार उपस्थित होते. यावेळी विक्रम पाटील, नारायण पाटील, कामराज निकम, साहेबराव खरकार, अहमद शेख, जिजाबराव सोनवणे, व्ही.एम.देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!