प्राथमिक शिक्षकांची ‘झेडपी’त धावाधाव

0

अवघड क्षेत्र बदल्यांसाठी सर्वसाधारण करण्यास तीव्र विरोध 

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरूवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राज्यातील अन्य जिल्हा परिषदेप्रमाणे नगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात घोषित करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील तीनशेहून अधिक अवघड क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धाव घेत या शाळा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्यास तीव्र विरोध दर्शवला.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे धोरण ठरवतांना राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाने बदलीसाठी सर्वसाधारण आणि अवघड क्षेत्रातील शाळा अशी वर्गवारी केली आहे. ही वर्गवारी करतांना नगरसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या नाकीनऊ आले. आपली शाळा अवघड क्षेत्रात वर्ग व्हावी, यासाठी शिक्षकांनी आपले वजन वापरून अनेक ठिकाणी फेरबदल करण्यास भाग पाडले असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे प्रशासन आणि पदाधिकारी यांची डोकेदुखी वाढली होती.
राज्यातील चार जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव घेवून संपर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पावलावर पाऊल ठेवत नगर जिल्हा परिषदेन गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्याचा ठराव मंजूर केला. याचे वृत्त समजताच अवघड क्षेत्रातील शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धाव घेत अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्यास तीव्र विरोध दर्शवला.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवदेन देण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेच्या ठरावामुळे अवघड क्षेत्रातील शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्यांची हक्काची बदली होण्यास अडचण होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वेक्षण करून दुर्गम भागातील शाळा शोधल्या होत्या. यामुळ संपूर्ण जिल्हा सर्वसाधारण घोषित केल्यास दुर्गम भागात काम करणार्‍या शिक्षकांवर अन्य ठरणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. यावेळी अमोल मांगुडे, विजय सांगळे, विकास खरमाळे, विकास दावभट, शहाजी कोळसे, बाळासाहेब सालके यांच्यासह मोठ्या संख्याने शिक्षक उपस्थित होते.

  सुमारे 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी अध्यक्षा शालिनीताई विखे यांची भेट घेत संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात घोषित करण्याची मागणी केली होती. त्यावेळी अध्यक्षा विखे यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडे लेखी मागणी करण्याची सुचना केली होती. अवघड क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांचा रोष नको म्हणून त्यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्षा विखे यांनी पत्र देण्यस टाळले होते.

LEAVE A REPLY

*