प्राथमिक शिक्षकांची अदालत होणार पुन्हा सुरू

0

अशोक कोल्हे : शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींना आश्‍वासन

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत काही वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्‍नावर चर्चा करून ते सोडवण्यासाठी आयोजित करण्यात येणार्‍या शिक्षक अदालतमध्ये खंड पडला होता. मात्र, आता ही शिक्षक अदालत पुन्हा नियमित सुरू होणार असल्याचे आश्‍वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींनी दिले आहे.

 
प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची शनिवारी जिल्हा परिषदेत बोलवण्यात आली होती. यावेळी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना कोल्हे यांनी उत्तरे दिली. यापुढे तालुकास्तरावर एकदा आणि जिल्हास्तरावर दोनदा शिक्षकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी शिक्षक अदालत भरवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि उपाध्यक्ष यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 
यासह आदीवासी भागात काम करणार्‍या प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी त्वरीत देण्याचे आवश्‍वास कोल्हे यांनी शिक्षकांना दिले. अपंग शिक्षकांना तातडीने वाहन भत्ता अदा करणे, शिक्षकांची वैद्यकीय बिल तातडीने अदा करणे, आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना समावून घेतांना जिल्ह्यातील शिक्षकांवर अन्याय होवू देऊ आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रशासनकडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.

 
यावेळी शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले, गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष संजय शेळके, गुरूकुलचे संजय धामणे, संजय शेळके, राजेंद्र निमसे, राजेंद्र शिंदे, दिलीप दहिफळे, नवनाथ अडसूळ, तुकाराम अडसूळ, रावसाहेब सुंबे, दत्तात्रय जपे, रा.या. औटी, नवनाथ तोडमल, बाबा आव्हाड, सुर्यभान काळे, भास्करराव कराळे, विजय काटकर, साहेबराव अनाप आणि शिक्षक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*