प्राजक्ता अडकली लग्नबंधनात!

0

एका लग्नाची दुसरी गोष्ट, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, ढाबळ यांसारख्या कार्यक्रमाद्वारे प्राजक्ता हनमघरने आजवर प्रेक्षकांना खळखून हसवले आहे.

सध्या ती कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

प्राजक्ताने नुकतेच लग्न केले आहे.प्राजक्ता हनमघरने धुमधडाक्यात लग्न न करता साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तिने नुकतेच रजत धळे सोबत लग्न केले. रजत एका कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे. त्याचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाहीये. तो मुळचा बारशीचा असून त्याचे शिक्षण पुण्यात झाले आहे.

पुण्यातील एका प्रतिष्ठित कंपनीत तो सध्या नोकरी करत आहे.

१४ ऑगस्टला अतिशय साधेपणाने आणि अगदी जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित प्राजक्ता आणि रजतने लग्न केले.

प्राजक्तानेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

LEAVE A REPLY

*