प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरात पाणीटंचाई

0
जळगाव / वीजपुरवठा खंडीत झाल्याने तीन दिवसांपासून वाघुरधरण आणि जलशुद्धीकरणातून पाणीपुरवठा बंद झाला. यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
नागरीकांना खाजगी टँकरसह बोअरवेलने पाणीपुरवठा करण्यात आल्याने पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले असून रात्री उशिराने काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला.
वादळ वार्‍यामुळे चिंचोली-उमाळा दोन झाड्यांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने उमाळा जलशुद्धीकरण केंद्राजवळ दि.3 ते 6 पर्यंत 11 ते 14 वीजपुरवठा खंडीत झाला होता.

त्यामुळे शहरात पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाही. परीणामी गेल्या चार दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला .

प्रशासनाकडून चार दिवसापासून खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दरम्यान,रात्री उशिरापर्यंत काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच शहरातील 10 जलकुंभमध्ये पाणी भरण्याचे काम सुरु होते.

जळगावकरांची पाण्यासाठी वणवण
सलग चार दिवसांपासून शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दुरुस्ती करुन देखील फिडर वारंवार बंद पडत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी वितरण प्रणाली विस्कळीत झाली. त्यामुळे जळगावकरांना पाण्यासाठी अक्षरश: वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.

LEAVE A REPLY

*