प्रवासी महिलेचे मंगळसुत्र लंपास करण्याचा प्रयत्न

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जळगाव बसस्थानकावरील बसमध्ये एका प्रवासी महिलेची मंगलपोत लांबविण्याचा प्रयत्न झाला. यानंतर बसची जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये दीड तास तपासणी करण्यात आली. प्रवाश्यांचीही चौकशी करण्यात आली. ही घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नांद्रा बुर्द्रक जवळील फेसर्डी मधील रहिवाशी अलका शरद पाटील (वय ३७) राहतात. त्या कामानिमीत्त बाहेरगावी जात होत्या. जळगाव बसस्थानकावरुन जळगाव कुरंगी पाचोरा या बसमध्ये अलका पाटील बसल्या.

बस सुरु होत असतांनाच गर्दीचा फायदा घेत एकाने अलका पाटील यांच्या गळ्यातील मंगलपोत तोडली. प्रसंगाधान राखत पाटील यांनी आरडा ओरड करीत तुटलेली अर्धवट पोत हातात धरली. दरम्यान बस क्रमांक एम.एच.४० डब्ल्यु ९१०५ वरील बसचालक मानसिंग बीसन परदेशी यांनी वाहक रघुनाथ नामदेव तायडे यांच्याशी चर्चा करुन बस थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये नेली. याठिकाणी पोलीसांकडून तपासणी केल्यानंतर महिलेने तक्रार दिली नाही. त्यामूळे कोणताही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

दीड तास बसची तपासणी

जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये बस आणल्यानंतर महिलीने घडलेला प्रकार कथन केला. पोलीसांनी बसमधील एकाही प्रवाश्याला खाली न येवू देता. बसची तपासणी केली. सफौ शिवाजी वराडे, पोहेकॉ प्रशांत पाठक, शेखर पाटील, करुणासागर जाधव, सध्देश्‍वर दायतर यांनी बसची तपासणी केली. अलका पाटील यांच्या मंगलपोतमधील सुमारे ३० मणी तपासणीत सापडून आले. मात्र मंगलपोतमधील बाकीचे मणी मिळून आले नाही.

बसस्थानकावर नेहमीच चोरीच्या घटना

जळगाव बसस्थानकावर नेहमीच पॉकीटचोरीच्या घटना घडत आहेत. त्यामूळे अतिरीक्त कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*