Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

प्रयत्नांती परमेश्वर… परीक्षेचा मार्ग नाही खडतर…

Share

मुखर्पपणे सोडिता जाते ।
शहाणपण शिकता
होते कारभार करिता उमगते।
सकळ काही ॥
आपले संत म्हणत असत जो माणूस म्हणून जन्माला आला आहे. त्याच्या बाबतीत आपण कधीच निराश नसतो. कारण माणूस प्रयत्नाने स्वतःला घडवू शकतो. आपण सारे जण फार पूर्वी अमिबासारखे एकपेशीय प्राणी होते. जर अमिबापासून क्रमशः विकसीत होत होत आपण माणूस झालो तर मग आजपसून असाच विकास चालू ठेवून आपण महान, थोर होऊ शकू की नाही?

आता इ. 10वी व 12वीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. मी माझ्या सर्व परीक्षार्थी बंधू, भगिनींना सांगू इच्छितो की, वार्षिक परीक्षा ही आपण केलेल्या अभ्यासाचे मुल्यमापन करण्याचे साधन आहे. त्यामुळे मनात कोणताही बाऊ भीती बाळगण्याची गरज मुळीच नाही. दिलेल्या उत्तर पत्रिकेवर मुद्देसुद मांडणी करुन सोडवायचा असतो.

आपण वर्षभर अभ्यास कसा केला आहे. त्यावर आपल्याला त्याची उत्तरे लिहिता येतात. आता इ. 10वीचे कृतीपत्रिका आराखडा स्वरुपानुसार प्रश्नपत्रिका असतात. त्यामुळे आपण थोडा चांगला सराव करुन ते प्रश्न सहजच सोडवू शकतात. मी तर माझ्या युवक मित्रांना सांगितले की, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे, ‘श्रमाचे कण गोळा करण्यात जे स्वारस्य आहे ते मनाचे मनोरे रचण्यात नसते…’

यासाठी एक उदाहरण लक्षात ठेवावे ते म्हणजे आईन्स्टाईन हा प्रसिध्द शास्त्रज्ञ आपणा सर्वांना ठाऊक आहे. विद्यार्थी दशेत हा आईन्स्टाईन मंद बुध्दीचा हेाता. ग्रीक भाषेत आईन हे उपपद असून स्टोन किंवा स्टाईन याचा अर्थ दगड.

अनेकदा शिक्षक आईनस्आईन यास म्हणत नावाप्रमाणेच दगड आहेस. परंतु आईनस्टाईरने आपल्या सततच्या व सातत्याने केलेल्या प्रयत्नांच्या सहाय्याने स्वतःला घडविले तो स्वतः जीवन आणि जगत यांचे गंभीरपणे चिंतन करु लागला. अविश्रांत परीश्रमाने त्याने सापेक्षता वादाचा सिध्दांत शोधन काढला.

एकेकाळी सर्वांना दगड वाटणारा आईनस्टाईन एखाद्या प्रचंड पर्वताप्रमाणे शास्त्रज्ञांच्या मालिकेत तळपू लागला म्हणून युवकांनो माणसाने आपल्या मनातील न्युनगंड काढून टाकावा आणि प्रत्यक्ष व्यवहार करीत असताना किंवा अभ्यासानंतर परीक्षेला जातांना आपल्याकडील एकेक उणीव नाहीशी करुन चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात.

आपल्याला परीक्षेत उत्तरे आठविणार नाही किंवा उत्तरे लिहिता येणार नाही किंवा मी नापास होणार असे सारे नकारार्थी प्रश्न मनातून काढून टाकावे. कारण असा नकारार्थी न्युनगंड मनात ठेवून आपल्यात चांगली सुधारणा होणार नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन नेहमीच म्हणत असत की, या जगात अशक्य काय आहे? माझ्या जीवनाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. तर अशाप्रकारे आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण संकटांना अडचणींना आपण खरोखरच धैर्याने सामोरे जायला हवे.

परीक्षेत प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका लिहितांना मनाला एकच सांगायचे की मी हमखास चांगल्या गुणांनी पास होणारच. असा प्रयत्न किंवा विचार केल्यास आपण उत्तम गुणांनी खरच पास होऊ. पण ह्यासाठी अभ्यासाचे पयत्न ही आवश्यक आहे. केरळ येथील विनायकन या मुलाने एक वेळेस सांगितले होते की, मी 9वीला असतांना नापास झालो होतो. पण त्यानंतर सातत्याने प्रयत्न केला.

अभ्यासाचा सराव केला 9वी तर पास झालोच पण या अभ्यासाच्या रोजच्या सवयीमुळे इ. 10वीला 89 टक्के गुण मिळवून पास झालो. खरच विनायकचे ही आपण आदर्श होऊ शकतो की जो इ. 9वीला नापास झाला होता पण त्यानंतर सतत अभ्यासाच्या प्रयत्नामुळे 10वीला मिरीटमध्ये आला. आपणही सततच्या अभ्यासाच्या प्रयत्नामुळे उत्तम गुण मिळवून पास होऊ शकतो.

एका कवीने आपल्या काव्यातून अभ्यासाचा सराव वा प्रयत्न कसा असावा हे सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे होय. अभ्यासाचा प्रयत्न फुलाप्रमाणे असावा जसे फुल कोमल व सुगंधी असतो त्याचप्रमाणे आपला अभ्यासाचा सराव हा सुगंधी व आनंदी असावा.

नदीप्रमाणे निर्मळ नितळ असावा
वातीप्रमाणे धाडसी असावा
सुर्याप्रमाणे तेजस्वी, चमकणारा असावा
चांदण्याप्रमाणे प्रकाशीत असावा
पाण्याप्रमाणे स्वच्छ, पारदर्शी असावा
चंदनाप्रमाणे झिजणारा असावा
झाडाप्रमाणे सावली देणारा असावा
धृवाप्रमाणे संयमी असावा

म्हणजे राव व अभ्यासात कधीच कामचलाऊपणा नसावा, कंटाळा नसावा. प्रत्येक वेळी अभ्यास आनंदी मनाने केल्यास हमखास यश मिळणारच. आजची नवीन पिढी वाचन फारच कमी करते. मी त्यांना सागेल की एक वचन लक्षात ठेवा. ‘वाचाल तर वाचाल’ वाचनच तुम्हाला कायम अभ्यासातील बारकावे लक्षात आणून देण्यास महत्त्वाचे कार्य करीत अभ्यासाचा सराव वेळेचे नियोजन व प्रयत्न हाच आपला माग असावा हे कायमच मनात कोरुन ठेवा कार की,

प्रयत्नांनी परमेश्वर
नाही मार्ग खडतर
उत्तम करा काम
ठेवा भरवसा स्वतःवर
सार्‍या विश्वाची शक्ती
तुम्हाला नेणार प्रगती पथावर
चिंता करु नकोस
हमखास यशस्वी होणार
फक्त एकच करा
अभ्यासाचा वेळ वाया नाही जाणार
यासाठी करा नियोजन
मग बघा
तुम्हाला प्रयत्नांची तारणार परमेश्वर…
परीक्षार्थी विद्यार्थी इ. 10वी, 12वी यांच्यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करीतो की,
पूर्ण होवोत
तुमच्या आकांशा
व इच्छा
हीच परमेश्वराकडे मागणे व बोर्डाच्या परीक्षेसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा…
मो. 9270860296
– किरण विठ्ठल पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!