प्रभासचे राजमौलींना भावनिक पत्र!

0

‘बाहुबली’ व ‘बाहुबली2’च्या यशानंतर प्रभास भारतीय सिनेमात चर्चेचा विषय बनला आहे.

आज ‘बाहुबली’ला दोन वर्षे पूर्ण झालेत. याच मुहूर्तावर प्रभासने फेसबुकवर राजमौली यांना एक पत्र लिहिले आहे. यात प्रभासने आपल्या मनातील प्रेम, आदर  व्यक्त केला आहे. प्रभास लिहितो, ‘आज माझ्या आयुष्यातील सर्वाधिक खास चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे झालीत. ‘बाहुबली: दी बिगनिंग’मध्ये माझ्यासकट अख्ख्या टीमने अतिशय समर्पणाने काम केले होते. मी माझ्या चाहत्यांचाही आभारी आहे, ज्यांनी मला एक क्षणही स्वत:पासून वेगळे केले नाही. बाहुबली टीमला खूप खूप शुभेच्छा. विशेषत: या सगळ्यांमागे असलेली व्यक्ती म्हणजे, राजमौली यांचेही आभार. आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत.’

प्रभासच्या या भावनिक पत्रावर तूर्तास राजमौली यांनी उत्तर दिलेले नाही..

प्रभास सध्या ‘साहो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच प्रभास  प्रभुदेवाच्या बॉलिवूडपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याचेही कळतेय. या चित्रपटात तमन्ना भाटिया लीड रोलमध्ये आहे. तमन्नाच्या विनंतीवरूनच प्रभासने या चित्रपटासाठी होकार दिला आहे.

LEAVE A REPLY

*