प्रभाग क्रमांक ३१च्या मतदानासंदर्भात उच्च न्यायालयाचे चौकशीचे निर्देश

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. २:

नाशिक महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक ३१ मध्ये झालेल्या मतदानातील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

निवडणूकांदरम्यान या प्रभाग ३१ मध्ये मतदारांना पैसे वाटणे, बोगस मतदान यांसारख्या तक्रारी पुराव्यासह उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली.

त्यानंतर ९ मार्च रोजी न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिल्याचे पत्र दोनच दिवसांपूर्वी तक्रारकर्ते ज्योती गायकवाड आणि अनिल गायकवाड यांना प्राप्त झाले आहे.

या प्रभागातून दोन भाजपा आणि दोन शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. तक्रारदार ज्योती गायकवाड या स्वत: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणूक उमेदवार होत्या.

LEAVE A REPLY

*