प्रत्येक स्त्रीने जिजाऊ व्हावे – सौ.गौरी थोरात

0

रावेर , | प्रतिनिधी :  मुलांना सुसंकृत, बुध्दीवान, घडविण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जिजाऊ होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडवितांनी जिजामातेंनी  देखील यावर भर दिला होता असा संदेश साक्षात जिजाऊ भूमिका निभावतांना सौ.गौरी थोरात यांनी उपस्थित श्रोत्यांना दिला. तर जिजाऊंच्या आत्मकथनाने उपस्थित श्रोते भारावले होते.

रावेर येथील माऊली ङ्गाउंडेशनतर्ङ्गे आदित्य इंग्लिश स्कुलयेथे राजमाता जिजाऊच्या धगधगत्या संघर्षमय जिवन प्रवासावर आधारित संपूर्ण इतिहास व आत्मचरित्र या एक तासाच्या एक पात्री नाट्य प्रयोगातून जनतेच्या डोळ्यासमोर मांडला सौ.गौरी अशोक थोरात यांनी, यात त्यांनी मॉ साहेब जिजाऊ यांच्या माहेरच्या व्यथा आणि दु:ख तसेच शिवबाच्या जन्म प्रसंगीचे दु:ख कथन करीत असतांनाच शिवबाच्या आयुष्यातील सुख-दु:खाचे प्रसंग नजरेसमोर उभे केले. यामुळे रंगमंचासमोरील प्रत्येक श्रोता भारावून इतिहासाचा अनुभव घेत होता.

यावेळी डॉ.एस.आर.पाटील, श्रीराम पाटील, जळगाव येथील प्रसिद्ध ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.उदयसिंग पाटील, वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, गटविकास डॉ.सौ.सानिया नाकाडे, पो.नि.कैलास काळे, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, राजीव पाटील, मोहन पाटील, चंद्रकांत अग्रवाल, योगेश गजरे, रमेशराव थोरात, नगरसेविका रंजना गजरे, नगरसेवक ऍड.सुरज चौधरी, नगरसेविका सौ.संगीता महाजन, भास्कर महाजन, ऍड.एम.ए.खान, गणपत शिंदे, कडू चौधरी, यादवराव पाटील, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते. तर सौ.थोरात यांचा सत्कार डॉ.सौ.योगिता पाटील, सौ.कल्पना नगरे, सौ.सुमन पाटील, श्रीमती कांता बोरा, सौ.हेमलता राजेंद्र राणे, सौ. मंगला कैलास काळे, सौ.वैशाली पंडित आदींसह विविध संघटनांनी केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ङ्गुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. येथील आदित्य इंग्लिश स्कुलच्या लहान मूलांनी छत्रपती शिवाजी महाराज व अङ्गजल खान भेटीचा पोवाडा सादर केला.

तर वनविभागाच्या विविध योजनांमध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्याने वनविभागाने डॉ.संदीप पाटील व डॉ.सौ.योगिता पाटील या दाम्पत्याला ग्रीन आर्मीचे प्रमाणपत्र देऊन सौ.गौरी थोरात (साक्षात जिजाऊ) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण चौधरी यांनी केले .

सूत्रसंचलन करून आभार दिपक नगरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदित्य इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय पाटील, राकेश गडे, नितीन पाटील, ललित पाटील, प्रकाश महाजन, निलेश महाजन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*