Video : प्रत्येक संधीचे सोने करा – नमिता कोहोक

0

स्त्री ही आपल्या परिवाराचा कणा असते ती वाकली तर कुटुबांचा कणा नाहीसा होतो. महिलांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केले पाहिजे. आपल्याला एक आयुष्य मिळाल आहे ते पुर्ण जगून घ्या. हे आयुष्य आपण घडवायचं की बिघडवायचं हे आपल्या हातात आहे.

त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बाहेर पडल्यानंतर मी माझं उर्वरीत आयुष्य घडविण्याचा विचार केला. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर घर, कुटुंब, नोकरी या सर्वच गोष्टींपासून दूर गेले परंतु तरीही जगण्याची उमेद कायम होती काहीतरी करून दाखवायचचं ही दांडगी ईच्छाशक्ती मनात बाळगून मोठया धैर्याने कॅन्सरचा सामना केला. या सर्व प्रवासात मी स्वत:ला शोधलं. आत्मपरिक्षण केल्यानंतर मला माझं अस्तीत्व मला सापडलं.

त्यानंतर स्वत:चा शाळांना समुपदेशान करण्याचा आगळावेगळा व्यवसाय मी निवडला. माझीच कहानी मी सांगू लांगली. सुरवातीला अनेक अडचणी आल्या परंतु नंतर प्रचंड यश मिळत गेले. नोकरी आठ तासांची असते परंतु चोवीस तासांची नोकरी म्हणजे व्यवसाय असतो हे मला समजले. या सर्व प्रवासात अन्य महिलांनी साथ दिली.

एक महिला दुसरया महिलेची मदत करत नाही हा समज माझया बाबतीत चुकीचा ठरतो. महिलांनी परस्परांप्रती आदरभाव व्यक्त केला पाहिजे. एकमेकीच्या सोबत राहिले पाहिजे.यशस्वी स्त्री मागे एक पुर्ण कुटुंब असते. चौकटीच्या बाहेरचे आयुष्यही खूप सुंदर आहे ते एकदा जगलं पाहिजे.

नमिता पारितोष कोहोक, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड क्वीन

LEAVE A REPLY

*