Type to search

धुळे

प्रताप गडावर जिवाजी महाले यांचे स्मारक व्हावे

Share

धुळे । छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर स्मारक व्हावे, या मागणीसाठी अखिल भारतीय जिवासेनातर्फे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शन करण्यात आली. 14 जानेवारीपर्यंत स्मारकाच्या काम सुरू न झाल्यास जनआंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, 3 ऑगस्ट 2005 रोजी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून स्मारकासाठी ठराव झालेला आहे. प्रतापगडावर स्मारकासाठी 0.15 जागा व त्या स्मारकाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी, सातारा यांनी दि.18 ऑक्टोंबर 2013 रोजी बैठकीनंतर पाऊने तीन कोटीचे अंदाजपत्रक मंजूर झाल्याचे व त्या सोबत गडावरील जागेचा नकाशा 7/12 उतारा प्रतिकृतीचा नकाशा व इतर सर्व मान्यता प्राप्त कागदपत्रे सोबत दिलेली आहेत. तरी 14 जानेवारी 2020 पर्यंत जिवा महालेंच्या स्मृतीदिनी स्मारकाचे भुमीपूजन व्हावे, यासाठी लक्षवेधी सत्याग्रह करण्यात येणार आहे.

गेल्या पंधरा वर्षापासून अखिल भारतीय जिवासेना या मागणीसाठी संघर्ष करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ठिसाळ कारभाराच्या निषेधार्थ, एकदिवशीय सत्याग्रह महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे. जर येत्या 14 जानेवारीपर्यंत जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भुमिपूजन करून कामाची सुवात केली नाही तर जनआंदोलन तिव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. होणार्‍या परिणामास शासन जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.  देण्यात आले आहे. यावेळी धुळे जिल्हा जिवा सेनेचे समाधन निकम, भगवान चित्ते, सुधील महाले, गणेश ठाकरे, ओंकार येशी आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नाभिक समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!