‘पोस्ट’ला पासपोर्ट कामाची प्रतिक्षा ; परराष्ट्र मंत्रालय विभागीय कार्यालयाचा भार हलका

0

नाशिक : पासपोर्ट केंद्राच्या सुविधांचा अधिक विस्तार करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने नवीन पासपोर्ट आणि त्याचे नुतनीकरण काम टपाल विभागाला देण्याचे जाहीर करून तीन महिने उलटत आले तरी ‘जीपीओ’ला या कामाचे आदेशाचा लखोटा आलेला नाही. त्यामुळे पासपोर्ट काम टपाल विभागातून अद्याप सुरु झालेले नाही.

परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयात पासपोर्ट काढण्याऐवजी जवळच्या टपाल कार्यालयातून तो काढता येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात घोषित केलेले आहे.ही सुविधा टप्प्याटप्प्याने सर्व विभागीय कार्यालयांमध्ये सुरु होईल, अस त्यात े नमूद होतेे. टपाल विभागाला काम देऊन या विभागाची सक्रियता कायम ठेवण्यासाठी तसेच खेडोपाडी असलेल्या संपर्क जाळ्याचा उपयोग करून घेत नागरिकांना आहे तेथेच पासपोर्ट सुविधा देण्याचा त्या मागील उद्देश आहे. वाढत असलेली पासपोर्टची मागणी यामुळे मंत्रालयान पासपोर्ट सेवा केंद्रांबरोबरच समांतर यंत्रणेसाठी टपाल कार्यालयांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतलेले आहे.

राज्यात प्रायोगित तत्वावर पासपोर्ट टपाल कार्यालयात काढून देण्यासाठी मुंबई विभागात येणार्‍या औरंगाबादची निवड करण्यात आली आहे. नाशिकही याच विभागात समाविष्ठ आहे. संबंधित टपाल कार्यालयाच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मात्र जीपीओला या कामासाठी अदयाप कोणतेही पत्र मिळालेले नसल्याने पासपोर्ट काढून देणे आणि नुतनीकरण करणे काम सुरु नाही.

LEAVE A REPLY

*