पोलीस 24 तास रस्त्यावर दिसणार : शर्मा

0
अवजड वाहनांसाठी आर्म फोर्सची स्थापना
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात चोर्‍या घरङ्गोड्या, चेन स्नेचिंग, बॅग लिफ्टींग असे अनेक प्रकार घडत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे नव्याने आलेले पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नवा ङ्गंडा काढला आहे. आता शहरात 24 तास सेक्टर पेट्रोलिंगच्या माध्यमातून पोलीस रस्त्यावर दिसणार आहे. तसेच शहरातील वाहतूकीची कोंडी काढण्यासाठी अवजड वाहने बाह्यवळणाने काढण्याासाठी मुख्यालयातून आर्म फोेर्सची स्थापना करण्यात येणार आहे. आठवडाभरात ही यंत्रणा रस्त्यावर असेल असे शर्मा यांनी सांगितले.
कोतवाली व तोङ्गखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीत मोठ्या प्रमाणात चोर्‍या, घरङ्गोड्या, चेन स्नेचिंग, बॅग लिफ्टींग होत आहे. तसेच कापडबाजारात ग्राहकांना लुटण्याचे व महिलांच्या छेडछाड होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. याला आळा घालण्यासाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सेक्टर पेट्रोलिंग हा ङ्गंडा सुरू केला होता. त्याच बरोबर शिघ्र कृतीदल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या यांना शहरातील ठारविक भाग व कापडबाजार येथे गस्त घालण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकारामुळे कोतवाली, भिंगार, एमआयडीसी, तोङ्गखाना या हाद्दीतील बहुतांश गुन्हेगारी कमी झाली होती. या उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी देशमुख हे स्वत: रात्रगस्त घालत होते.
प्रत्येक नाके, बीट, सेक्टर, नाकाबंदीची ठिकाणे तपासत होते. कामात कुचराई करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करीत होते. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख घटला होता. मात्र ते उस्मानाबाद येथे पोलीस अधिक्षक या पदावर बढती होऊन गेल्यानंतर ही सर्व व्यवस्था जैसेथे झाली. त्यांच्या नंतर शहरात एकाही अधिकार्‍याने विशेष लक्ष दिले नाही. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शमा यांनीदेखील सहा जिल्ह्यात अशाच प्रकारचा ङ्गंडा वापरला आहे.
त्याचे ङ्गलीत त्यांना सकारात्मक मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी शहरात सेक्टर पेट्रोलिंग, महिलांची पेट्रोलिंग, राखीव तुकड्यांची गस्त, शहरातील वाहतूक समस्या, बाह्यवळण रस्ता, अवजड वाहने, स्त्रीयांची छेडछाड, वृद्धांची लुट, चोर्‍या, घरङ्गोड्या या प्रश्‍नांंना पुन्हा हात घातला आहे. आता शहरात सकाळी 10 दुचाकी वाहने त्यावर प्रत्येकी दोन कर्मचारी असे 20 पोलीस तर रात्री 10 वाहने व 20 कर्मचारी असे 40 पोलीस 24 तास रस्त्यावर दिसणार आहे. ज्या कर्मचार्‍याच्या हाद्दीत चोरी, घरङ्गोडी, चेन स्नेचिंग किंवा अन्य प्रकार घडेल. त्या घटनेस संबंधीतास दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राखीव दलाच्या तुकड्या ऐनवेळी उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांना शहरात गस्त घालण्याचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस रस्त्यावर दिसल्यानंतर शहरातील बरीच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी तयार होते. त्यामुळे स्वस्तीक चौक, चांदणी चौक, स्टेट बँक चौक, डीएसपी चौक, पत्रकार चौक, झोपडी कॅन्टीन, प्रेमदान चौक, सावेडी, बोल्हेगाव ङ्गाटा, नवनागापुर, सह्याद्री चौक अशा अनेक ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढलेले असल्याचे दिसत आहे. त्यात अनेकांनी जीव गमवावा लागल्याचे अधिक्षकांच्या लक्षात आले आहे.
त्यामुळे हा प्रश्‍न कायमाचा सोडविण्यासाठी आठ ठिकाणी बीट तयार करून त्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा व मुख्यालयातून आर्म ङ्गोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या आठ ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी आर्म ङ्गोर्स महत्वाची भूमीका पार पाडणार आहे. येत्या आठ दिवसात या उपायोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे शमा यांनी सांगितले.

गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी प्रयत्न
शहरे सुरक्षीत राहण्यासाठी तसेच तेथील कायदा व सुव्यवस्था कायम टिकण्यासाठी प्रशासनाने काही धोरणे आखली आहेत. त्यात नगर शहरात चोर्‍या, घरङ्गोड्या यांच्यासह चेन स्नेचिंगचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा विचारात घेऊन नगर शहरात हा पहिला प्रयोग सुरू केला आहे. त्यानंतर श्रीरामपुर, संगमनेर, नेवासा, कोपरगाव, राहाता, श्रीगोंदा, जाखेड, पाथर्डी अशा काही ठिकाणी हा उपक्राम राबविण्यात येणार आहे. पोलिसांच्या सोबत नागरिकांनी देखील जागरूक राहणे गरजेचे आहे. असे झाल्यास गुन्हेगारीस आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.
– रंजनकुमार शर्मा (जिल्हा पोलीस अधिक्षक)

सक्षम अधिकार्‍याची गरज
शहरात उपायोजना राबवायच्या असतील तर तेथे अप्पर पोलीस अधिक्षक व शहर पोलीस उपअधिक्षक सक्षम असणे गरजेचे आहे. कोतवाली व तोङ्गखाना पोलीस ठाण्यातील कर्मचारी निर्ढावलेले आहेत. त्यांच्याकडून काम करुन घेणारे सक्षम अधिकारी आवश्यक आहे. शहरातील काही अधिकारी कार्यतत्पर नसल्यामुळे ही यंत्रणा राबविताना मोठी कसोटी लागणार आहे. त्यासाठी येणार्‍या बदल्यांच्या गॅझेटमध्ये नव्याने काम करु पाहणार्‍या तरुणांना शहरात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास हे शक्य आहे. तसेच शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथील पोलीस ठाण्यात सक्षम पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांची नेमणुक करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*