पोलीस भरतीसाठी साडेसत्तावीस हजार अर्ज ; शारीरिक, मैदानी क्षमता चाचणी उद्यापासून

0

नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील 169 रिक्त जागांसाठी 27 हजार 720 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. अर्ज सादर करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून, रात्री 12 वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांच्या संख्येत वाढ होऊ शकते असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तर या प्रक्रियेतील प्रत्यक्ष मैदान व शाररीक चाचणी बुधवार (दि.22) पासून सुरू होत आहे.

राज्यभरात रिक्त झालेल्या पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदाच्या 79 व व बॅण्डसमन पदाच्या 18 जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली जात आहे. यासाठी 24 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली होती. 16 मार्चनंतर त्यात तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. आजचा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने इच्छूकांची एकच धांदल उडाल्याचे शहरात चित्र होते. शहर पोलिस दलात भरती होण्यास एकूण 14 हजार 220 उमेदवार इच्छूक आहेत. यात, शिपाईपदासाठी 10 हजार 642 तर ब्रॅण्डसमन पदासाठी एक हजार 410 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये महिला उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत उमेदवारांचा आकडा आणखी वाढू शकतो. शहर पोलिस दलाची भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून, आज सोमवारी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांना रूपरेषा समजावून सांगण्यात आली.

जिल्हा ग्रामीण पोलिस दलासाठी े 72 जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी सुमारे 13 हजार 500 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत यात आणखी पाचशे अर्जांची भर पडू शकते, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. 22 मार्च रोजी सकाळी पाच वाजेपासूनच सर्व प्रक्रिया सुरू होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यासाठी डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजच्या मैदानाचा काही अंशी वापर होणार आहे. दरम्यान, यासाठी चार सहायक पोलिस अधिक्षक, 16 पोलिस निरीक्षक, 350 पोलिस कर्मचारी व या व्यतिरिक्त काही बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*