पोलीस भरतीसाठी अडीच हजार अर्ज ; 300 महिला उमेदवारांचा सामावेश

0

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या रिक्त 79 जागांसाठी मागील दहा दिवसांत सुमारे 2600 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.पैकी 2300 अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने आले आहेत. इच्छुकांमध्ये 300 महिला उमेदवारांचाही समावेश आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार 75 टक्के म्हणजेच 79 रिक्त जागांची भरती प्रकिया सुरु झाली आहे. 24 फेब्रुवारीपासून त्यासाठी इच्छुक उमेदवारां ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. ती 17 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. विविध प्रवर्गांतील जागा भरण्याची प्रकिया सुरु असून सर्वाधिक 34 जागा खुल्या प्रवर्गासाठी असून त्याखालोखाल अनुसुचीत जमातीसाठी 16, अनुसुचीत जातीसाठी 10, इतर मागासवर्गीयांसाठी 8 तसेच इतर प्रवर्गांसाठी 11 अशा एकूण 79 जागा पोलीस प्रशासनामार्फत भरल्या जाणार आहेत.

यातील 18 जागा या बॅन्डपथकासाठी आहेत. इच्छुक उमेदवारांनी पोलीस प्रशासनाच्या संकेतस्थळांवर संपर्क साधून ऑनलाईनरित्या अर्ज करता येणार आहे. या संकेतस्थ्लृळांवर पोलीस भरतीसाठी लागणार्‍या सर्व प्रकारची आवश्यक माहिती उपलब्ध केली असून त्या पुर्तता करून उमेदवारांनी अर्ज भरणे आवश्यक राहणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च पर्यंत असून अर्जासोबत लागणारे शुल्क 21 मार्चपर्यंत स्टेट बँकेत भरता येणार आहे.

24 फेब्रुवारी ते 6 मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत शिपाई पदासाठी एकूण 2 हजार 670 अर्ज पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यापैकी 300 अर्ज महिला उमेदवारांचे आहेत. त्याचप्रमाणे 2 हजार 300 अर्ज ऑनलाइनपद्धतीने करण्यात आलेले आहेत. पुढील अकरा दिवसांत या जागांसाठी हजारो अर्ज प्राप्त होण्याची शक्यता पोलसी प्रशासनातर्फे वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*