पोलिसावर रोखले पैशासाठी पिस्तुल!

0

तपोवन रस्ता चौकातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोघांच्या वादात मध्यस्ती करण्यास गेलेल्या एक पोलीस कर्मचारी व त्यच्या भावाच्या डोक्यावर आठ ते दहा जणांतील दोघांनी पिस्तुल रोखल्याची घटना नगर- औरंगाबाद रोडवरील हॉटेल इंद्रायणी समोर घडली.
वाहनाचे हाप्ते न भरल्यामुळे हा प्रकार झाल्याचे बोेलले जात आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी सम्राट अशोक गायकवाड व त्यांचे कुटुंब प्रवरा संगम येथे वडीलांच्या अस्ती विसर्जन करण्यासाठी जायचे होते. त्यासाठी त्यांनी पप्पु रमेश पाचारणे (रा. बोल्हेगाव) यांची कार भाड्याने केली घेतली होती. प्रवरा संगमकडे जात असताना हॉटेल इंद्रायणी समोर अचानक पाच ते सहा जण गाडीला आडवे झाले. या वाहनाचे हाप्ते थकलेले आहे. असे म्हणुन त्यांनी कार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाहन चालकाने त्यांना सांगितले की; कारचे सर्व हाप्ते भरलेले आहेत. कंपनीला फोन करुन खात्री करा. आम्ही जलदान विधीसाठी जात आहोत. आल्यानंतर तुम्हाला भेटतो अशी विनंती केली. काही काळ दोघांची बाचाबाची झाली असता आरोपींनी काढता पाय घेतला.
गायकवाड यांचे कुटुंब सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रवरा संगम येथून परत येत असताना याच ठिकाणी आठ ते दहा जणांनी त्यांना अडविले. पाचारणे यांना खाली ओढत आरोपींनी वाद सुरू केला. तुम्ही कारचे हाप्ते भरलेले नाही, त्यामुळे गाडी येथे सोडून द्या. हा वाद मिटविण्यासाठी कारमध्ये बसलेले पोलीस कर्मचारी सम्राट गायकवाड हे खाली उतरले. त्यांनी आरोपींची समज घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही ही कार भाड्याने केली आहे. दु:खद विधी करून आम्ही घराकडे चाललो आहोत. आम्हाला घरी सोडून आल्यानंतर तुम्ही हाप्त्यांची चौकशी करा.
या दरम्यान दोन तरुण वाहनांवर आले. त्यातील एकाने सम्राट गायकवाड यांच्या छातीवर पिस्तुल ठेवून पाच हजार रूपये दे आणि गाडी घेऊन जा. नाहीतर जाग्यावर ठार करेल अशी धमकी दिली. हा प्रकार गायकवाड यांचे भाऊ मयुर याने पाहीला असतो तो खाली उतरला. त्यांना शिवीगाळ दमदाटी करू नका अशी विनंती केली. याच वेळी वाहनावर बसलेल्या दुसर्‍या तरुणाने मयुरच्या डोक्यातर पिस्तुल लावला.
जास्त बोलशील तर गोळ्या घालुन ठार करेल अशी धमकी दिली. यावेळी वाहनातील महिलींनी एकाच आरडाआरड केला. तसेच पोलीस ठाण्यात फोन करण्यात आला. या प्रकारानंतर आरोपींनी घटनास्थळाहुन पळ काढला. याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ
एका पोलीस कर्मचार्‍याच्या व भावाच्या डोक्याला पिस्तुल रोखून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पोलीस ठाण्यात याबाबत माहीती देण्यात आली. ही घटना एक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकार्‍यांना सांगत असताना देखील त्यांना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. न्यायव्यवस्थेतील एका व्यक्तीने पोलीस अधिक्षकांना फोन केल्यानंतर या कर्मचार्‍याची तक्रार घेण्यात आली. त्यामुळे पोलिसांचा मनमानी कारभार पुन्हा पहावयास मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*