पोलीस कर्मचार्‍यांच्या पारदर्शक व इच्छेनुसार बदल्या

0

शर्मा यांच्या कार्यकाळात खाकीला अच्छे दिनचे संकेत

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक वर्षापासून पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचे बोलले जाते. वशीलेबाजी नसणार्‍यांना थेट दुरचे रस्ते दाखविण्यात आले होते. त्यामुळे पोलीस दलात अद्याप नाराजी टिकून आहे. हे चित्र मिटविण्यासाठी पोलीस अधिक्षक रंजनकुमार यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांसाठी शर्मा यांच्या कार्यकाळात खरोखर ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

 
सन 2003 साली विश्‍वास नांगरे पाटील यांनी कर्मचार्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन मागेल तेथे बदली दिली होती. त्यामुळे ते अधिकारी खाकीच्या मनात घर करून गेले. त्यानंतर 2006 मध्ये सुनिल रामानंद यांनी देखील हा फंडा राबवून कर्मचार्‍यांचे कुटुंब एकसंघ ठेऊन त्यांच्याकडून हवे तसे काम करून घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत 2010 मध्ये कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्या पुर्ण केल्या. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही कर्मचार्‍याची विशेष तक्रार त्यांच्याकडे आली नाही. हवे तेथे बदली घ्या व हवे तसे काम करून दाखवा. हा फंडा पोलीस खात्यात त्यांनी यशस्वी करून दाखविला. मात्र त्यांच्यानंतर आलेल्या पोलीस अधिक्षकांनी आपला मनमानी कारभार सुरू केेले. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांना अर्थपुर्ण तडजोडीने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बनविले.

 

जिल्ह्यात कलेक्टर झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात स्वत:ची मक्तेदारी सुरू केली. पोलीस अधिकार्‍यांच्या जवळचा कर्मचारी दुय्यम अधिकार्‍याचा सन्मान विसरला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार, एमआयडीसी, नगर तालुका, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा, अकोले, संगमनेर, राहाता, शिर्डी अशा अनेक ठिकाणी 15 ते 20 वर्षे एकाच पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांनी आपले ठाण मांडले होते. या कर्मचार्‍यांनी दलाल, पुढीरी, व्यापारी, सराईत गुंड, तस्कर, लाचलुचपत शाखा असे अनेक प्यादे हाती धरले होते. त्यामुळे त्यांना अधिकारी देखील वचपुन राहत होते.

 

या पोलीस कर्मचार्‍यांची मजल इतकी होती की त्यांनी पोलीस अधिक्षकांना देखील एका जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या विरोधात किंवा बदलीत हात घातला तर अधिक्षकांपासून तर अधिकार्‍यांपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील या कर्मचार्‍यांनी राबविली आहे. त्यामुळे कोतवाली व तोफखान्या सारख्या अनेक पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांची मोठी पकड होती.

 
ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी हात घातला. कोतवाली व तोफखान्यासह अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे नोकरी करून मलीदा गोळा करणार्‍यांच्या बदल्या केल्या. कायदा व सुव्यवस्थेला दुय्यम स्थान देणार्‍या अधिकर्‍यांच्या नियंत्रण कक्षेत बदल्या केल्या. सन 2015 साली चारशेपेक्षा जास्त कर्मचार्‍यांचे फरबदल करण्यात आले. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. ज्यांना पोलीस खात्याविषयी आवड नाही, किंवा ज्यांनी खाकीची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले त्यांच्या अंगावरुन वर्दी काढून घेण्याचे काम लखमी गौतम यांनी केले. या बदलामुळे प्रस्तपित कर्मचार्‍यांना धक्का बसला. तर पोलीस दलातील मक्तेदारी संपृष्ठात आली. पोलीस खात्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लखमी यांनी चांगली व्युव्हरचना आखली होती, त्या अधिच त्यांची बदली करण्यात आली.

 
नंतरच्या काळात पोलीस अधिक्षक डॉ. त्रिपाठी यांच्या कार्यकाळात पोलीस खात्यात कधी नव्हे इतके बदल्यांचे नगन्य गॅझेट बाहेर पडले. एका वर्षात अधिकार्‍यांच्या पाच ते सहा वेळा बदल्या करण्यात आल्या. अर्धशतकाच्या जवळपास कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या खर्चीवर विरोजमान होण्यासाठी अर्थपुर्ण तडजोडी करण्यात आल्या. जे सक्षम अधिकारी होते मात्र त्यांची तडजोड करण्याची इच्छा नव्हती त्यांना साईडच्या शाखेत आजवरचा कार्यकाळा काढावा लागला. काही अधिकार्‍यांची पात्रता नसताना त्यांनी पोलीस ठाणे दिलेल्यामुळे मोठ्या प्रश्‍नांना व कायदा व सुव्यवस्थेला तोंड द्यावे लागले.

 

अधिकारीच नव्हे तर कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी महिला पोलीस व कर्मचार्‍यांशी अर्थपुर्ण तडजोडी केल्या. चूक नसताना काही अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलीस दलाच्या मनात मोठा असंतोष भरला होता. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रंजनकुमार शर्मा यांनी पारदर्शकतेचे संकेत दिले आहे. त्यामुळे पोलीसांना या बदल्यांमध्ये अच्छे दिन येण्याची शक्यता आहे असे म्हटल्यास वावघे ठरणार नाही.

 

महिलांच्या समस्या महत्वाच्या
पोलीस खात्यात महिलांचे अनेक प्रश्‍न असतात. संसार, बाळ, पती, नोकरी, शारिरीक समस्या, आरोग्य या सर्वांमधून मार्ग काढून त्या नोकरी करीत असतात. मात्र त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक केली जाते. सोपस्कर बंदोबस्त मागीतला तर दिला जात नाही. वशीलेबाजीने मात्र सर्व काही प्राप्त होते. काही दिवसपुर्वी एका महिलेची शारिरीक समस्या एका अधिकार्‍याने एकली नाही. त्यामुळे तिने मर्यादा सोडून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यामुळे खरोखर एखाद्या व्यक्तीची समस्या असेल तर ती अधिकार्‍यांनी ग्राह्य धरणे अपेक्षीत असते.

 

बदल्या पूर्णपणे पारदर्शी
पोलीस कर्मचार्‍यांच्या हिताच्या दृष्टीने बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचा विचार आहे. हवे ते पोलीस ठाणे मिळाले तर हवे तसे काम देखील अपेक्षीत आहे. असे न झाल्यास थेट मुख्यालयात बदली करण्यात येईल. इच्छेनुसार पोलीस ठाणे देण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी जागा नसेल तर मिळेल तेथे काम करण्याची मानसिकता कर्मचार्‍यांनी ठेवली पाहीजे. आपण खात्याशी प्रामाणिक राहीले पाहीजे. बदल्यांमध्ये कोणी नाराज होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. येणार्‍या बदल्या पुर्णपणे पारदर्शी असणार आहे. व इच्छेनुसार पोलीस ठाणे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-रंजनकुमार शर्मा
(जिल्हा पोलीस अधिक्षक)

LEAVE A REPLY

*