पोलीस आयुक्तांचा नेटीझीयन्सला सल्ला ; नक्की बघा व्हिडीओ

0

नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी नेटीझीयन्सला इंटरनेटच्या वापराबाबत सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. नाशिक पोलिस सायबर सेलच्या फेसबुक पेजवर एका व्हिडीओद्वारे त्यांनी अतिरिक्त इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम विषद करून यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिक पोलिसांचा हा व्हिडीओ एका दिवसांतच साडेचार हजारहून अधिक नागरिकांनी बघितला आहे. अनेकांनी पोलीस आयुक्तांच्या या व्हिडीओचे स्वागत केले असून इंटरनेटच्या सावधगिरीने वापर करणार असल्याचे सांगितले आहे.

या व्हिडीओमध्ये डॉ. सिंगल यांनी इंटरनेट अनेक तरुण अडकण्याचे प्रमाण सध्या वाढले असल्याचे सांगितले आहे. तसेच फेसबुकवर अनोळखी मित्र जोडू नये तसेच इनबॉक्समध्ये आलेल्या संदेशांना उत्तर देऊ नये असेही डॉ. सिंगल यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*