पोलिस शिपाई भरतीसाठी आले इंजिनिअर आणि एमबीए उमेदवार

0

नाशिक , (खंडू जगताप) दि. २४ : सध्या नाशिक विभागात पोलिस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून हजारो तरुण या भरतीसाठी दाखल झाले आहेत.

या भरतीसाठी किमान पात्रता १२वी पास अशी असली तरी पदवीधर, द्विपदवीधर आणि इंजिनिअरींग, डिप्लोमा, एमबीए अशी व्यावसायिक पदवी पदविका असलेले तरुणही शारीरिक चाचणी देताना दिसत आहेत.

सागर हांडगे म्हणाला की मी बीई इलेक्ट्रॉनिक्स पदवी धारक आहे आणि भरतीसाठी येथे आलेलो आहे.

सिन्नर तालुक्यातून आलेला संदीप नवाले एमएसस्सी असून नोकरीअभावी पोलिस शिपाई होण्यासाठी येथे आल्याचे त्याने देशदूतला सांगितले.

दहेगावचा अजय मॅकॅनिकल डिप्लोमा असून तोही पोलिस भर्तीसाठी येथे आला आहे.

नाशिक पोलिस विभागात शिपाई पदाच्या ९७ जागा आहेत. शारीरिक क्षमता चाचणीत ५० टक्क्यांहून जास्त गुण मिळविणाऱ्या १४५५ (उपलब्ध जागेच्या १५ पट) उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे.

त्यात चांगल्या गुणांनी यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची पोलिस शिपाई म्हणून निवड होईल.

LEAVE A REPLY

*