पोलिस भरतीसाठी विग वापरण्याची क्लुप्ती उमेदवाराच्या अंगलट

0

नाशिक, ता. २५ : नाशिक येथे सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीदरम्यान उंची जास्त भरावी यासाठी एका उमेदवाराने डोक्याला विग चिकटविल्याची घटना उघडकीस आली आहे.

राहुल किसन पाटील असे या उमेदवाराचे नाव असून तो त्र्यंबकेश्वरचा राहणारा आहे. त्याने विगसोबतच डोक्यावर केसही चिकटवले होते.

शारीरिक चाचणीत तो उत्तीर्णही झाला होता. मात्र एका हवालदाराच्या लक्षात त्याची क्लुप्ती आल्याने त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले.

तसेच त्याच्यावर गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे.

त्याचा बनावटपणा पकणाऱ्या हवालदाराला बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

(विग लावलेला आणि विग काढल्यानंतर राहुल पाटील)

LEAVE A REPLY

*