पोलिस फायरिंगमध्ये 5 शेतकरी ठार : मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह

0
मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर मंदसौरच्या कलेक्टर आणि एसपींना हटविण्यात आले आहे.
नीमचमध्ये हॅलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर उदयपूरमार्गे ते मंदसौरला रवाना झाले आहेत.
राहुल गांधींनी आपल्या सुरक्षा रक्षकांना चकमा दिला असून ते बाइकवर मंदसौरकडे रवाना झाले आहेत.
त्यांना अडवण्यासाठी राजस्थान-मध्यप्रदेश सीमेवर नयागांव येथे 400 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहे.
येथून जवळच असलेले विक्रम सिमेंट रेस्ट हाऊस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला जेलमध्ये बदलण्यात आले आहे.
दुसरीकडे, मंदसौरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र कुमार आणि पोलिस अधीक्षक ओ.पी. त्रिपाठी यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली आहे.
आता शिवरपूरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची मंदसौरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी मान्य केले आहे, की मारले गेलेले 5 शेतकरी पोलिस फायरिंगमध्येच मारले गेले.

मध्य प्रदेशात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी आज भेट घेणार आहे.

या ठिकाणी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. बरखेडा पंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केली

LEAVE A REPLY

*