पोलिसावर पिस्तूल रोखणारा केडगावचा चव्हाण अटकेत

0

कोतकर, शिंदे पसार : कोठडीत रवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी) – वादात मध्यस्ती करताना पोलीस कर्मचारी सम्राट गायकवाड यांच्यासह त्यांच्या भावावर पिस्तूल रोखणारा केडगावचा ओंकार चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पिस्तूल रोखणारे दोघे पसार झाले असून ते दोघेही केडगावचेच रहिवासी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहेत.
सोमवारी (दि.5) सकाळी पोलीस कर्मचारी सम्राट अशोक गायकवाड यांचे कुटुंब प्रवरा संगम येथून वडीलांच्या अस्ती विसर्जन करुन येत असताना सायंकाळी नगर-औरंगाबाद रोडवरील तपोवन रस्ता चौकात आठ ते दहा जणांनी त्यांना अडविले होते. वाहन चालक पप्पु पाचारणे यांनी गाडीचे हाप्ते भरलेले नाही असे म्हणत त्याच्याशी वाद सुरू केला. हा वाद मिटविण्यासाठी पोलीस कर्मचारी सम्राट गायकवाड यांनी मध्यस्थी केली असता त्यांच्या छातीवर पिस्तूल ठेवून पाच हजार रूपयांची मागणी केली होती. गायकवाड यांचे भाऊ मयुर डोक्यालाही दुसर्‍या तरुणाने पिस्तूल रोखले. गोळ्या घालून ठार करेल अशी धमकी दिली होती.
सहायक पोलीसे निरीक्षक अतुल चिंतले यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील चित्रणानुसार ओंकार चव्हाण यास संशयीत म्हणुन ताब्यात घेतले असता या सर्व घटनेचा उलगाडा झाला आहे. या घटनेत पिस्तूल रोखणारे मुख्य आरोपी केडगाव परिसरातील कोतकर व शिंदे असल्याची माहिती चव्हाण याने दिली आहे. अन्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल चिंतले यांनी दिली.

LEAVE A REPLY

*