पोलिसाला मारहाण; एकास अटक 

0

केडगाव बायपासवरील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव परिसरात वाहतुक नियंत्रण करणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍यास बीडच्या वाहन चालकाने मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.22) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.

यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांची खाकी वार्दी फाटली आहे. तसेच काही वस्तुंचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवीगाळ दमदाटी व मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महादेव सुर्यभान निमसे (शहर वाहतुक शाखा) असे जखमी पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बाह्यवळणासाठी आठ ठिकाणे निच्छित केले आहेत. त्यात केडगाव चौफुलाचा सामावेश आहे.

या ठिकाणी आर्म फोर्स पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश शर्मा यांनी

दिले आहेत. असे असून देखील वाहतुक नियंत्रण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना वाहनचालकांकडून मारहाण केली जात आहे. सोमवारी निमसे हे केडगाव चौफुला येथे वाहतुक नियमन करीत असताना त्यांनी विजय विश्‍वनाथ धुरंधरे (रा. गेवराई) यांचा टेम्पे (एम. एच 20 बीटी 2080) आडविला होता.

तुमचा टेम्पो पुणे-नगर हायवेने घेऊन जा अशी विनंती त्यांनी केली. मात्र धुरंदरे यांनी पोलीस कर्मचार्‍याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केले. पोलीस कर्मचार्‍यांना वाहतुक अडविण्यासाठी रस्त्यात लावलेले बॅरीकेड उडवुन दिले. पोलिसांनी त्यास अडविले असता त्याने वाद घालण्यास सुरूवात केली. शहरात 12 ते 4 वाजेपर्यंत जड वाहनांना परवानगी नाही, असे त्यास सांगण्यात आले.

त्यावर वाहन चालकाने बस नगरकडे चालल्या आहेत हे पोलिसांना दिसत नाही का? मग मलाच का आडवतात, तुम्ही लोक दारु पिलेले आहेत काय असे म्हणुन अश्‍लिल शिवीगाळ केली. उपस्थित कर्मचारी व प्रवाशांनी धुरंधरे यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणाचे एकले नाही. पोलीस कर्मचारी निमसे यांची गचांडी धरुन त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केले.

खाकी शर्ट धरून त्याने जोराने ओढून तो फाडला. तसेच निमसे यांचा चष्मा देखील फोडून टाकला. या घटनेनंतर पोलिसांनी वाहन चालकावर कायदेशीर कारवाई केली.

त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर करीत आहेत.

वरिष्ठांनी शहानिशा करावी
वाहतुक नियमानऐवजी पोलीस आर्थिक तडजोड मोठ्या प्रमाणावर करतात. पैसे न देणार्‍या वाहनचालकांना अडवले जाते. या वादातून अशी हुज्जत होते. काही बनावट पोलीस कर्मचारी तर बनावट पावत्यांचा देखील वापर करतात. याचा वरिष्ठांनी शोध घ्यावा.
– प्रशांत साठे, सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

*