Type to search

जळगाव

पॉजमशिनविना वंचितांना रेशन मिळावे!

Share

जळगाव । पॉजमशिनवर अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने सुमारे 35 टक्के लाभार्थ्यांना दरमहा मिळणार्‍या स्वस्त धान्य योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यापैकी काही रेशनींगचा माल काळया बाजारात विक्री होतो, तर काही माल शासनाला परत जात आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढून सरसकट स्वस्त धान्य योजनेचा लाभ व्हावा, अशी मागणी जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली.

जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात संघटनेचे समन्वयक मोहम्मद पिंजारी व राज्य सचिव वाय.डी.पाटील यांनी नव्याने अन्न, नागरी पुरवठा विभागाची अतिरिक्त जबाबदारी स्विकारलेले मंत्री ना.रावल यांची मंगळवार दि.11 रोजी मुंबई मंत्रालयात भेट घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी म्हणून विविध उपाययोजना राबविण्याच्या मागण्यांचे आपले निवेदन त्यांना दिले.

रॉकेलचा कोटा पूर्ववत सुरू करावा
केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस योजने लाभ बहुतांश ग्रामीण व आदिवासी पाड्यांपर्यंत अजून सुद्धा पोहचला नाही. जिथे लाभार्थ्यांनी गॅस कनेक्शन घेतले तिथे पुन्हा गॅस सिलेंडर पोहचण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेल्या असल्याने 100 टक्के गॅस कनेक्शन व सिलेंडरची व्यवस्था होईपर्यंत ग्रामीण व आदिवासी भागात रॉकेलचा कोटा पूर्ववत सुरू व्हावा, अशी सुद्धा मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनातील मागण्याबाबत सार्वजनिक वितरण प्रणालीची बैठक बोलावून सर्व माहिती घेण्याचे आश्वासन ना.रावल यांनी दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!