पैंजणावरून महिलेच्या खुनाचा तपास

0

नवर्‍याला अटक; बेलवंडी पोलिसांचे यश

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिखली गावाच्या हद्दीत नगर-दौंड रस्त्यावरील पुलाच्या खाली सापडलेल्या मृत महिलेल्या खुनाचा तपास लावण्यात बेलवंडी पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेल्या पायातील पैंजणावर असलेल्या दुकानदाराच्या ठशावरून खुनाचा उलगडा झाला आहे.
याप्रकरणी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (कासारवाडी) येथील कैलास आनंदराव नरके याला ताब्यात घेतले आहे. कैलास नरके याने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिखली शिवारात आणून टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. 12 मे रोजी चिखली गावाच्या हद्दीत नगर-दौंड मार्गावरील पुलाखाली अनोळखी माहिलेचा मृतदेह सापडला होता. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मुत्यू रजि. नंबर 27/2017 सीआर पी सी 174 प्रमाणे दाखल करण्यात आला. या मयत महिलेल्या पायातील पैंजणावर असलेल्या सोनाराच्या नावाच्या ठशाच्या आधारे तपास करून महिलेली ओळख पटवण्यात आली. महिलेचे नाव सवीता कैलास नरके (रा. कासारनरके, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) असे तपासात समोर आले. यावरून पोलिसांनी मयताचा पती कैलास नरके याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.
महिलेच्या खुनाचा तपास लावण्यात पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व त्यांच्या पथकातील पोहेकॉ. वाघ, पो.ना. आबासाहेब झावरे, पोना. देशमुख, पो.कॉ. राहुल मोढळे यांनी केला. कैलास नरके याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास नरके हा ट्रक चालक असल्यामुळे तो पत्नी सविताला घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील चिखली घाटातून चालला होता. यावेळी त्यांच्यात वाद झाला. यातून त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह नगर-दौंड रोडवरील पुलाखाली टाकून दिला. यानंतर त्याने आपल्यावर कुणाचा संशय येऊ नये म्हणून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी सविता ही हरवल्याची तक्रार दिली. मात्र बेलवंडी पोलिसांनी मयत सविता हिच्या पायातील पैंजणावरून खुनाचा तपास लावण्यात यश मिळवले. मयताची ओळख पटवल्यानंतर पती कैलास नरके याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील हकिगत सांगितली.

LEAVE A REPLY

*